इफ्तार पार्टीसाठी पूजा हेगडेनं केलेल्या लूकची नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली; म्हणाले, “ही पहिल्यांदाच…”

मुंबई | Pooja Hegde – गेल्या काही दिवसांपासून लोकप्रिय अभिनेत्री पूजा हेगडे (Pooja Hegde) चांगलीच चर्चेत आहे. लवकरच तिचा ‘किसी का भाई किसी की जान’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. तसंच आताही पूजा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. पूजानं काल (16 एप्रिल) मुंबईतील ताज लँड्स हाॅटेलमध्ये बाबा सिद्दीकी (Baba Siddique) आणि त्यांचा मुलगा झीशान सिद्दीकी (Zeeshan Siddique) यांच्या इफ्तार पार्टीत (Iftar Party) हजेरी लावली होती. या इफ्तार पार्टीतील पूजाचे काही फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. तसंच इफ्तार पार्टीसाठी पूजानं केलेला लूक पाहून नेटकऱ्यांनी तिला चांगलंच ट्रोल केलं आहे.
पूजानं इफ्तार पार्टीसाठी ब्लॅक कलरची साडी, स्लिव्हलेस ब्लाऊज आणि त्यावर व्हाईट स्टोनची ज्वेलरी परिधान केली होती. पूजानं केलेल्या या लूकची नेटकऱ्यांनी खिल्ली उडवली आहे. तिच्या इफ्तार पार्टीतील व्हायरल झालेल्या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कमेंट्स करून तिला ट्रोल केलं आहे.
पूजाच्या इफ्तार पार्टीतील व्हायरल व्हिडीओवर एका नेटकऱ्यानं कमेंट करत म्हटलं आहे की, ‘हिला ड्रेसिंग सेन्स आहे की नाही, ही इफ्तार पार्टी आहे, कुठला अवाॅर्ड शो नाही’. तर दुसऱ्यानं कमेंट केली, ‘ही इफ्तार पार्टी आहे, डान्स पार्टी नाही’. तर आणखी एका नेटकऱ्यांनं म्हटलंय, ‘ही कदाचित पहिल्यांदाच इफ्तार पार्टीला आली असेल, त्यामुळे तिने चुकीचा ड्रेस घातला आहे.’
दरम्यान, या इफ्तार पार्टीला पूजा हेगडेसह अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. यामध्ये सलमान खान, सुनिल शेट्टी, कपिल शर्मा, इम्रान हाश्मी, नर्गिस फाखरी, प्रिती झिंटा अशा अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती.