ताज्या बातम्यादेश - विदेशमहाराष्ट्ररणधुमाळी

“आम्ही विनंती करतो की, यशवंत सिन्हा यांनी राष्ट्रपती निवडणुकीतून माघार घ्यावी!”

मुंबई – Presidential Elections : दोन दिवसांवर (१८ जुलै) येऊन ठेपलेल्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमुळे देशाचं राजकीय वातावरणात मोठ्या स्तरावर हालचाली सुरु आहेत. भाजपकडून राष्ट्रपती पदासाठी आदिवासी महिला द्रोपदी मुर्मू यांना उमेदवारी देण्यात आली आहे तर कॉंग्रेस कडून यशवंत सिन्हा यांना उमेदवारी देण्यात आली आहे. दरम्यान, भाजप आणि कॉंग्रेस मध्ये चुरशीची लढत सुरु असल्याचं बघायला मिळत आहे.

भाजपकडून महिला उमेदवार असल्यामुळे आणि त्यातही देशात पहिल्यांदाच आदिवासी उमेदवाराला राष्ट्रपती होण्याची संधी मिळत असल्याने देशातील मोठ्या प्रमाणात नेत्यांकडून भाजपला पाठींबा दिला जात आहे. महाराष्ट्रातील उद्धव ठाकरे यांनी देखील त्याच कारणामुळे भाजपला पाठींबा देण्याचा निर्णय घेतला असल्याचं म्हटलं आहे.

शनिवारी आप पक्ष कॉंग्रेसला पाठींबा देणार असल्यचं पक्षाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. मात्र भाजप आणि कॉंग्रेस मध्ये ही लढत चुरशीची होणार असल्याचं चित्र आहे. दरम्यान, भाजप उमेदवाराला अनेक पक्षांकडून पाठींबा मिळत असल्यानं वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी यशवंत सिन्हा यांना राष्ट्रपती निवडणुकीतून माघार घेण्याचा सल्ला दिला आहे.

प्रकाश आंबेडकर यांनी ट्वीट करून ‘अनेक पक्षांच्या अनुसूचित जाती आणि जमातींच्या सदस्यांनी मुर्मू यांना पाठींबा देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आमची विनंती आहे की यशवंत सिन्हा यांनी राष्ट्रपती निवडणुकीतून माघार घ्यावी.’ असा सल्ला दिला आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये