थॉमस कप विजेत्या बॅडमिंटन टीमचे पंतप्रधान मोदीजींकडून कौतुक; म्हणाले …

दिल्ली : आज सकाळी दिल्लीमध्ये भारतीय बॅडिमटपटूं आणि थॉमस कप विजेती बॅडमिंटन टीममधील इतर सहकार्यांनी पंतप्रधान मोदी यांची भेट घेतली. १४ वेळा विजेत्या इंडोनेशियाचा ३-० असा धुव्वा उडवत थॉमस कप भारताने जिंकला आहे.यामुळे बॅडिमटपटूंवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. भारताचे ७३ वर्षांच्या स्पर्धेच्या इतिहासातील हे पहिलेच विजेतेपद होते. मोदींनी विजेत्या टीमचे तोंडभरून कौतुक केले आहे.
पंतप्रधान मोदी म्हणाले की, होय, आम्ही करु शकतो… हा सकारात्मक दृष्टीकोन देशाचे बलस्थान बनला आहे. मी बॅडमिंटनपटूंना खात्रीपूर्वक सांगतो की सरकार सर्व प्रकारे शक्य होईल ती मदत तुम्हाला करेल. मी टीममधील सर्वांचे देशवासियांच्या वतीने अभिनंदन करतो. तुमचा विजय ही काही छोटी घटना नाही.असं मोदी म्हणाले.
दरम्यान, थॉमस कप विजेत्या टीमचे नेतृत्व करणाऱ्या श्रीकांत किदम्बीने आपल्या टीम चे कौतुक करत सांगितले की, सर्वच सदस्य चांगले खेळत होते, माझं लक्ष्य होतं या सर्वांना एकत्र आणणे कारण ही एक स्पर्धा आहे. टीमने एकसंघ खेळणे आवश्यक आहे. आम्ही प्रत्येक खेळाच्या वेळी छोट्या छोट्या चाली रचल्या, लक्ष्य निश्चित केले. मला संघाचं लिडर म्हणून फारसं काम करावं लागलं नाही कारण सर्वजण चांगला खेळ करत होतं. याबरोबर देशाचे प्रतिनिधीत्व करणे ही एक मोठी संधी होती.अशा शब्दात त्याने आपल्या भावना व्यक्त केल्या.