ताज्या बातम्यादेश - विदेश

पंतप्रधान मोदी बनले पायलट, चालवलं ‘तेजस’ फायटर प्लेन

PM Narendra Modi | पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) पायलट बनले होते. आज पंतप्रधानं मोदींनी ‘तेजस’ (Tejas) फायटर प्लेन (Fighter Jet) चालवलं. त्यांनी बंगळुरूमध्ये (Bengluru) हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनीला भेट दिली. त्यावेळी मोदींनी स्वदेशी तेजस फायटर जेटमधून उड्डाण केलं. तसंच मोदी हे फायटर प्लेनमधून उड्डाण करणारे पहिले पंतप्रधान ठरले आहेत.

तेजय हे भारताचं ‘मेक इन इंडिया’ फायटर जेट आहे. हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडनं तेजस फायटर प्लेनची निर्मिती केली आहे. सध्या या विमानाचे दोन स्क्वॉड्रन भारतीय हवाई दलात दाखल झाल्या आहेत. तर हे सिंगल इंजिन असणारं विमान आहे.

तर आज पंतप्रधान मोदींनी तेजस फायटर प्लेन चालवण्याचा अनुभव घेतला. एक्सवर (ट्विटर) काही फोटो शेअर करत मोदींनी त्यांच्या अनुभवाबाबत माहिती दिली. आज आलेल्या अनुभवामुळे आपल्या देशाच्या क्षमतेवरील विश्वास वाढला आहे. खऱ्या अर्थाने आपण आत्मनिर्भर आहोत, असं मोदींनी म्हटलं आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये