येरवडा कारागृहातील कैदी आता करु शकणार कुटूंबियांना व्हिडिओ कॉल

पुणे | पुण्यातील येरवडा तुरुंगातील कैद्यांना आता त्यांच्या कुटुंबीयांसोबत कॉल किंवा व्हिडीओ कॉलवर बोलता येणार आहे. कैद्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या मानसिकेतच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला असून लवकरच या उपक्रमाला सुरूवात होणार आहे. यातच आता हा निर्णय घेतल्याने कैद्यांच्या कुटुंबीयांना दिलासा मिळणार आहे. (Prisoners Can make video calls to family members from jail)
याबाबत अधिक माहिती अशी की, कैद्यांना भेटण्यासाठी राज्यातील सगळ्यात कारागृहांमध्ये नाते व त्यांची मोठी गर्दी होत असते. तसेच कैद्यांना त्यांच्या बराखीतून कॉइन बॉक्स पर्यंत न्यावे लागते ते सुरक्षेच्या दृष्टीने जोखमीचे ही ठरू शकते. त्यामुळे मोबाईल फोन द्वारे संभाव्य धोका कळू शकतो, या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे.
कैद्यांना एकाच वेळी कुटुंबातील सगळ्यांशीच बोलता येईल या उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात येत आहे. या उपक्रमामुळे कैदी व त्यांच्या कुटुंबीयांना एकमेकांकडे भावना व्यक्त करता येतील. यामुळे दोघांवरील ताण तणाव कमी होण्यास मदत होणार आहे. टप्प्याटप्प्याने सर्वच कारागृहांमध्ये ही सुविधा सुरू करण्यात येणार आहे.