पुणे

अध्ययन व विश्लेषणाच्या जोरावर प्रगती होत असते; केंद्रीय राज्यमंत्री जनरल (डॉ.) व्ही. के. सिंग

पुणे ः अध्ययन आणि विश्लेषण या दोन तत्त्वांच्या जोरावर सदैव प्रगतीपथाची पायरी चढता येते. देश व समाज ही प्राथमिकता ओळखून कार्य केल्यास येणार्‍या काळात राजकारणात खूप मोठे बदल दिसतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विकासाचे धोरण देशातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचले आहे. राजकारणाच्या प्रचंड अभ्यासामुळेच ते एक यशस्वी नेता बनले आहेत, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक, महामार्ग आणि नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री जनरल डॉ. व्ही. के. सिंग (नि.) यांनी केले.

एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंटच्या मास्टर्स प्रोग्रॅम इन गव्हर्नमेंटच्या १४ व १५ व्या तुकडीचा दीक्षांत समारंभ स्वामी विवेकानंद सभागृहात संपन्न झाला. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी मिझोरामचे राज्यपाल डॉ. हरि बाबू कंभमपति होते. खा. गजानन कीर्तिकर हे अतिथी म्हणून उपस्थित होते. याप्रसंगी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड, माईर्स एमआयटीचे संस्थापकीय विश्वस्त प्रा. प्रकाश जोशी, एमआयटी डब्ल्यूपीयूचे कार्याध्यक्ष राहुल विश्वनाथ कराड, कुलगुरू डॉ. आर.एम. चिटणीस, कुलसचिव डॉ. प्रशांत दवे उपस्थित होते.

यावेळी सुवर्णपदक मिळविणारे संदीप बी, सार्थक साऊजी, मुथुरासन, स्नेहल देसाई, ज्युडा जेबा कुमार आणि प्रवीण कुमार झा यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये