समृद्धी महामार्गावर डिझेल चोरांची टोळी पकडली; ४ अटकेत

बुलढाणा : मागील दोन वर्षांत लहान मोठ्या अपघातांनी गाजलेल्या समृद्धी द्रुतगती महामार्ग वाढत्या गुन्हेगारीमुळे देखील वादग्रस्त ठरत आहे. या समृद्धी महामार्गावरील उभ्या असलेल्या वाहनांमधील डिझेल चोरीच्या (diesel-thieves) घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. दरम्यान लोणार तालुक्यातील बीबी पोलिसांच्या कारवाईत ही बाब उघड झाली आहे. बीबी पोलीस ठाण्याच्या पथकाने बुलढाणा जिल्ह्यातील चार जणांना ताब्यात घेतले आहे. यातील एक आरोपी हा इंधन चोर टोळीने चोरलेले डिझेल खरेदी करणारा निघाला असताना हि कारवाई करण्यात आली आहे. नागपूर- मुंबई अशा समृद्धी महामार्गावर वाहनांची प्रचंड रहदारी आहे. अनेकदा मोठ्या ट्रक रस्त्याच्या कडेला उभ्या केल्या जात असतात. या वाहनांमधून डिझेल चोरी केली जात होती. दरम्यान चंद्रपूरच्या कल्याणी टॉवर येथील किरण कुमार लिंगया कनुकुंटल (वय ३८) हे १३ नोव्हेंबर २०२४ रोजी ट्रकने समृद्धी मार्गावरून मुंबई येथून नागपूरकडे जात होते. लांबचा प्रवास असल्याने त्यांनी बुलढाणा जिल्ह्यातून जाणाऱ्या समृद्धीवरील (Samrudhi Highway) दुसरबीड टोल नाक्याजवळ आराम करण्यासाठी आपले मालवाहू वाहन थांबविले.