क्राईमताज्या बातम्या

शेअर मार्केटमधून आर्थिक नुकसान झाल्याने एकाच कुटुंबातील चाैघांची आत्महत्या 

पुणे | शहरातील मुंढवा भागात ही घटना घडली आहे. एकाच कुटुंबातील चाैघांनी आत्महत्या केल्याच्या या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार शेअर मार्केटमधून मोठी आर्थिक नुकसान झाल्याने चौघांनी आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे.

या चारही जणांचे मृतदेह ससून रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. आत्महत्या करणाऱ्यांमध्ये दीपक थोटे (वय 59), इंदू दीपक थोटे (वय 45), ऋषिकेश दीपक थोटे (वय 24) आणि समीक्षा दीपक थोटे (वय 17) या चौघांचा समावेश आहे. घटनेची माहिती मिळताच मुंढवा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

मूळचे अमरावतीमधील हे थोटे कुटुंब दोन महिन्यांपूर्वी केशवनगर परिसरात वास्तव्यास आले होते. शेजारी राहत असलेले  डॉ. दौलत पोटे यांना हे कुटुंबीय राहत असलेल्या फ्लॅटचा दरवाजा बंदच असल्याने संशय आल्याने त्यांनी केशवनगर पोलीस ठाण्यात कळविले. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. या चौघांचे मृतदेह पुढील वैद्यकीय तपासणीकरिता ससून रुग्णालयात पाठविले गेले आहेत. आर्थिक नुकसान झाल्याने त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले असावे, असा पोलिसांचा अंदाज आहे. जेवण्यातून विष घेतल्याचा संशय पोलिसांनी वक्त केला आहे. परंतु शवविच्छेदनानंतर आत्महत्येचं नेमकं कारण स्पष्ट होईल.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये