पुणे विभाग अॅक्शन मोडवर! बोर्ड अधिकाऱ्यांमार्फत परिक्षा केंद्रांची कसून झाडाझडती

पुणे : (Pune Education News) पुणे विभाग सध्या अॅक्शन मोडवर आले असून, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातील बड्या अधिकाऱ्यांमार्फत परिक्षा केंद्रांची कसून तपासणी करत परिक्षा केंद्रांची झाडाझडती घेतली जाणार असल्याची माहिती समोरी आली आहे. सुविधांमध्ये कसलीही कसर असेल तर, सबंधित परीक्षा केंद्रांची तात्काळ मान्यता रद्द करण्यात येणार आहे.
दरम्यान, पुणे विभागामध्ये तीन जिल्ह्यांचा समावेश आहे, पुणे, अहमदनगर, सोलापूर या तीन जिल्ह्यात दहावीसाठी 635 तर बारावीसाठी 412 परिक्षा केंद्र मंजूर केले जातात. विद्यार्थांची गैरसोय होऊ नये या उद्देशाने या केंद्रांची निवड केली जाते. मात्र, शेकडो रुपये परिक्षा शुल्क भरुन, विद्यार्थ्यांना आवश्यक त्या सुविधा परिक्षा केंद्र देतात का? असा प्रश्न यानिमित्ताने ऐरणीवर आला आहे.
परिक्षा केंद्रावर बैठक व्यवस्था, बेंचेस, लाईट, पंखे, सीसीटीव्ही कॅमेरे, स्वच्छतागृह यांसारख्या सुविधा असणे अनिर्वाय आहे. नवीन केंद्रांना मान्यता देण्यापूर्वी या सुविधांची तपासणी करावी लागते. तर जून्या केंद्रातील सुविधांचीही पडताळणी केली जाते.