Top 5क्राईमताज्या बातम्यादेश - विदेशपुणेमहाराष्ट्र

पुण्यातील हाय प्रोफाईल सेक्स रॅकेट चालवणारी ‘टाॅप दलाल कल्याणी देशपांडे’ला झाली शिक्षा

पुणे : (Pune Sex racket Jayshree kalyani Deshpande, Ravi Pradeep gavali) पुण्यात हाय प्रोफाईल सेक्स रॅकेट (Pune Sex racket) चालवणाऱ्या टाॅप दलाल जयश्री उर्फ कल्याणी उर्फ टीना देशपांडे (५२) (Jayshree Kalyani Teena Deshpande) आणि तिचा सहकारी रवी उर्फ प्रदीप रामहरी गवळी (Ravi Pradeep gavali) यांना प्रत्येकी सात वर्षे सक्तमजुरी आणि १० लाख रुपयांची दंडाची शिक्षा न्यायालयाने सुनावली. विशेष न्यायाधीश एस. आर. नावंदर यांनी हा निकाल दिला आहे. अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्याच्या (पिटा) तीन, चार आणि पाच कलमांन्वये आणि महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्याच्या (मकोका) कलम ३ (१) (२) व कलम ३ (४) नुसार न्यायालयाने दोषी ठरवले.

सामाजिक सुरक्षा शाखेने २०१६ तिच्या सेक्स रॅकेटचा (Sex racket) पर्दाफाश केला. पुण्याच्या भुसारी कॉलनीतल्या एका इमारतीमध्ये हा व्यवसाय सुरु होता. एक डमी गिऱ्हाईक पाठवून पोलिसांनी हा प्रकार उघडकीस आणला. या कारवाईत मुंबईतल्या दोन तर उझबेकिस्तानातल्या दोन मुलींना अटक करण्यात आली होती. 

कल्याणी देशपांडे हिच्यावर विविध पोलीस ठाण्यात पंधरा गुन्हे दाखल असल्याने तिच्यावर ‘मकोका’ कायद्यानुसार कारवाई करण्यात आली. तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन भोसले-पाटील आणि पोलीस निरीक्षक राधिका फडके यांनी या गुन्ह्याचा तपास करून आरोपींविरोधात न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये