पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर राष्ट्रीय पुरस्कार २०२१ राज्यपालांच्या हस्ते प्रदान

मुंबई : मुंबई राजभवन येथे सागा फिल्म्स फाउंडेशन तर्फे आयोजित दुसरा पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर राष्ट्रीय पुरस्कार २०२१चे वितरण राज्यपाल भगतसिंग कोशियारी यांच्या हस्ते शनिवारी राजभवन येथे झाले. राजमाता कल्पनाराजे भोसले, खासदार सुधाकर शृंगारे, व सागा फिल्म्स फाउंडेशनचे संस्थापक सागर धापटे – पाटील यावेळी उपस्थित होते.
यावेळी राज्यपाल यांनी आपलं मत व्यक्त केलं, ते म्हणाले “समाजाच्या अनेक श्रेत्रात आज नैतिक हास्य होताना दिसत आहे. स्वार्थाचा विचार बळावत आहे. स्वतः पलीकडे जाऊन आपल्या परिसरासाठी, समाजासाठी व देशासाठी थोडे जरी काम केले तरी देखील समाज उन्नत होईल. या दृष्टीने अहिल्यादेवी होळकर, झाशीचीराणी लक्ष्मीबाई व सवित्रीबाई फुले यांच्या श्रेष्ठ कार्यातून समाजाने प्रेरणा घ्यावी” असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी येथे केलं.
दिवंगत अभिनेते इरफान खान यांना त्यांच्या चित्रपट सृष्टीतील योगदानाबद्दल यावेळी त्यांना मरणोत्तर पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यांच्या पत्नी शुतफा इरफान यांनी पुरस्कार स्वीकारला. त्याचबरोबर भिवंडीच्या महापौर प्रतिभा पाटील, कीर्तनकार हभप सुदामभाऊ गोरखे कान्हा गुरुजी (जीवन गौरव), हास्य अभिनेते भाऊ कदम, समाजसेविका डॉ आयुषी देशमुख, पत्रकार रेखा खान यांसह ३७ जणांना रायपालांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.