राहुल नार्वेकरांचं मोठं वक्तव्य; म्हणाले, “सरकार पडायचं असेल तर…”

सिंधुदुर्ग | Rahul Narvekar : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी (Rahul Narvekar) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर निशाणा साधला आहे. जर सरकार पडायचं असतं तर सभागृहातील संख्याबळावर पडलं असतं, त्यामुळे कुणीही उगाचच सरकार पडणार अशी भाषा करू नये, असा खोचक टोला राहुल नार्वेकरांनी संजय राऊतांना लगावला आहे.
संजय राऊतांवर निशाणा साधताना राहुल नार्वेकर म्हणाले की, जर सरकार पडायचं असेल तर ते सभागृहातील संख्याबळावर पडलं असतं. सरकार हे सभागृहात अविश्वास ठराव झाल्यानंतर संख्याबळ कमी असले तर पडतं. कोणीही बाहेर बोललं म्हणून सरकार पडत नाही.
आताच्या सरकारनं बहुमताचा जादुई आकडा सभागृहात पार केला आहे. तसंच तेवढी संख्या असल्यामुळे या सरकारनं बहुमताची अग्निपरीक्षा पास केली आहे. कोणीही उगाचच असंवैधानिकपणे हे सरकार पडणार अशी भाषा वापरू नये, असंही राहुल नार्वेकर म्हणाले.