इतरदेश - विदेशपुणेमाय जर्नी

रेल्वे डब्यांची संख्या कमी असल्याने प्रवाशांचे हाल

पुणे : गेल्या काही महिन्यांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल, मुंबई येथील प्लॅटफॉर्म नंबर १० आणि ११ चे विस्तारीकरण करण्यात आले. यामुळे पुणे-मुंबईदरम्यान धावणाऱ्या सिंहगड, डेक्कन क्वीन, प्रगती या गाड्यांचे डबे वाढविण्यात येणार होते; परंतु काम पूर्ण होऊनही डब्यांची संख्या वाढविण्याचा निर्णय मात्र अजून झाला नाही. त्यामुळे प्रवाशांना धक्के खात प्रवास करावा लागत आहे. पुणे-मुंबईदरम्यान दैनंदिन प्रवास करणाऱ्यांची संख्या जास्त आहे; परंतु सिंहगड (Sinhgad), डेक्कन क्वीन (Deccan Queen), प्रगती (Pragati) या प्रमुख गाड्यांच्या डब्यांची संख्या कमी असल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत.

एसटी आणि ट्रॅव्हल्सचे तिकीट (Ticket )दर जास्त आहे. त्यामुळे पुणे-मुंबईदरम्यान रेल्वेने प्रवास (Passenger) करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून प्रमुख गाड्यांचे डबे १६ वरून २४ करावेत, अशी आमची मागणी आहे; परंतु रेल्वे प्रशासनाकडून दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे अनेकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे, असे प्रवासी संघ, पुणेचे हर्षा शहा यांनी सांगितले. 

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये