राज ठाकरेंचा पुणे दौरा : ‘या’ ठिकाणी होणार सभा
पुणे : राज ठाकरे सध्या पुण्याच्या दौऱ्यावर आहेत. २१ तारखेला राज यांच्या सभेचं नियोजन करण्यात आले आहे. त्यांच्या सभेला मंजुरी मिळेल कि नाही याची शंका होती. मनसेने राज ठाकरेंच्या सभेसाठी पोलिसांकडून परवानगी मागितली होती. त्यानंतर राज ठाकरे यांची सभा पुण्यातील भिडे पुलाशेजारील नदीपात्राच्या रस्त्यालगत होण्याची शक्यता आहे. दरम्यान, या सभेला नियम आणि अटी या विषयी पोलिस निर्णय घेतील, पुणे पोलिसांकडून सभेस्थळाची पाहणी करण्यात येत आहे. परंतु अधिकृत घोषणा अजून झालेली नाही.
पुण्यातील मनसे सभेला परवानगी नाकारण्याचं काहीच कारण नाही, असं राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी म्हटलं आहे. त्यामुळं याठिकाणीच सभा होणार हे निश्चित झालं आहे.
मनसेनं पोलिसांना दिलेल्या पत्रानुसार राज यांची सभा शनिवार 21 मे रोजी होणार आहे. या सभेसाठी मुठा नदी पात्रातील डेक्कन जिमखाना येथील जागा मनसेकडून निश्चित करण्यात आली आहे. या ठिकाणी सभेला आणि स्पीकर वापराला परवानगी द्यावी अशी मागणी मनसेनं पोलिसांकडे केली आहे.