ताज्या बातम्यारणधुमाळी

“राजसाहेब लवकर बरे व्हा नाहीतर…”; दिपाली सय्यद यांचा राज ठाकरेंवर निशाणा

मुंबई | Deepali Sayed On Raj Thackeray – आज सकाळी ९ वाजेपासून विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी मतदान सुरु आहे. नुकत्याच झालेल्या राज्यसभेच्या निवडणुकीनंतर आता विधान परिषदेच्या निवडणुकीच्या निकालाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. तर दुसरीकडे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर लिलावती रुग्णालयामध्ये आज शस्त्रक्रिया पार पडणार आहे. राज ठाकरेंच्या पायावर आज शस्त्रक्रिया होणार असल्याची माहिती समोर येत आहे. आज विधानपरिषदेच्या मतदान आणि निवडणुकीच्या निकालाकडे लक्ष असतानाच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते राज ठाकरेंच्या प्रकृती स्वास्थासाठी आणि आरोग्यासाठी प्रार्थना करताना दिसत आहेत. तसंच शिवसेनेच्या नेत्या दिपाली सय्यद यांनीही राज ठाकरेंना लवकर बरं व्हा असं म्हणत शुभेच्छा दिल्या आहेत. मात्र दिपाली सय्यद यांनी शुभेच्छा देतानाही त्याला राजकीय झालर चढवली आहे.

दिपाली सय्यद यांनी विधान परिषद निवडणुकीनंतर देवेंद्र फडणवीस एकटेच पडू नयेत म्हणून राज ठाकरेंनी लवकर बरं व्हावं असं म्हटलं आहे. दिपाली यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, “माननीय राजसाहेब आपण लवकरात लवकर बरे व्हा, नाहीतर विधानपरिषद निवडणुकीनंतर फडणवीस साहेब एकटे पडतील.” पुढे बोलताना त्यांनी, “भोंगा अजून अर्धवट आहे,” असंही म्हटलं आहे.

दरम्यान, राज ठाकरेंनी मशिदींवरील भोग्यांविरोधात आक्रमक भूमिका घेतल्यापासून दिपाली सय्यद यांनी वेळोवेळी मनसेविरूद्ध भूमिका घेतली आहे. तसंच प्रसारमाध्यमांवरील चर्चासत्रं असो किंवा सोशल मीडियावरील अकाऊंट्स असोत दिपाली सय्यद या मागील काही काळापासून त्यांच्या वक्तव्यांमुळे विशेष चर्चेत राहिलेल्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये