ताज्या बातम्यामहाराष्ट्ररणधुमाळीशेत -शिवार

ऊस दराचा वाद चिघळणार? राजू शेट्टींचा सरकार विरोधात एल्गार! म्हणाले; “शंभर खोके घालून सुद्धा…”

मुंबई : (Raju Shetty On State Government) राज्यात कोणाचे सरकार आहे याविषयी आम्हाला काहीच देणंघेणं नाही. महाविकास आघाडीचे असूद्या नाही तर, शिंदे-फडणवीसांचे सरकार त्यामुळे काहीच फरक पडत नाही. ऊस परिषद, साखर संकुलावर मोर्चा आणि दोन दिवस ऊसतोड बंद ठेवूनही राज्य सरकारला जाग येत नसेल तर, राज्यभर चक्काजाम करुन मंत्र्यांना मैदानातचं जाब विचारण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी दिला.

शेट्टी म्हणाले, 25 नोव्हेंबरला राज्यभरात चक्काजान आंदोलन करण्यात येणार आहे. यापुढे शंभर खोके घालूनही सरकार येऊ देणार नाही, असा गर्भित इशारा त्यांनी राज्य सरकारला दिला आहे. आमचे दोन दिवसांचे आंदोलन यशस्वी झाले आहे. मात्र, त्याला राज्य आणि केंद्र सरकार गांभिर्याने घेत नसल्याचे दिसून येत आहे. त्यांनी चर्चेलाही बोलावलं नाही, त्यामुळे कार्यकर्ते आक्रमक झाले असून, 25 तारखेला कोल्हापूर जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्ग रोखून राज्यमार्गावरही आंदोलन केलं जाणार आहे. अनेक राज्यमार्ग, जिल्हा मार्ग बंद ठेवू, असेही ते म्हणाले. 

शेतकरी स्वाभिमानी संघटनेने साखर उद्योग आणि ऊस उत्पादकांचे दोन महिन्यांपासून मुद्दे हाती घेतले आहेत. दुर्दैवाने राज्य सरकारकडून त्याची कोणत्याही प्रकारची दखल घेतली जात नाही. 25 वर्ष चळवळीत काम करत आहे. शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष केलेलं हे पहिलंच सरकार असून पहिल्यांदाच असंवेदनशील सरकार पाहत आहे. जे प्रश्न मांडले आहेत त्यांना पैसा घालावा लागत नाही. सरकार कारखानदारांना पाठिशी घालत आहे, असं म्हणतं राजू शेट्टी यांनी सरकारवर निशाना साधला आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये