राखी सावंतवर कोसळलं मोठं संकट; भावाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या; काय आहे प्रकरण ?

मुंबई | ड्रामा क्वीन अभिनेत्री राखी सावंत हिला मोठा झटका बसला आहे. चेक बाऊन्स प्रकरणी अभिनेत्री राखी सावंतचा (Rakhi Sawant brother) भाऊ राकेश सावंतच्या (rakesh sawant) अडचणी वाढल्या असून ओशिवरा पोलिसांनी त्याला अटक केली आहे. राकेशला ज्या प्रकरणात अटक करण्यात आली आहे, ते प्रकरण तीन वर्षे जुने आहे. राकेश सावंत यांच्यावर चेक बाऊन्स झाल्याचा हा गुन्हा एका व्यावसायिकाने नोंदवला होता. न्यायालयाने राकेश सावंत यांना पैसे परत करण्याच्या अटीवर जामीन दिला होता. मात्र राकेशने ते पैसे अद्यापही केलेले नाहीत. यानंतर न्यायालयाने पुन्हा अटक वॉरंट जारी केले. पोलिसांनी राकेशला 22 मेपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
अशी माहिती समोर आली आहे की, तीन वर्षांपूर्वी एका व्यावसायिकाने केलेल्या तक्रारीवरुन राकेश आनंद सावंतला कोर्ट केस क्रमांक ९६/ss/२०२१ कलम १३८ अ जामीन पात्र वॉरंटअंतर्गत अटक करण्यात आली. मीडिया रिपोर्टनुसार, राकेशला पैसे परत करण्याच्या अटीवर जामीन मंजुर करण्यात आलेला. मात्र त्याने पैसे परत न केल्याने अटक वॉरंट जारी करण्यात आले आणि शनिवारी ओशिवारा पोलिसांनी त्याला अटक केली.