अबबब… उर्फिच्या पावलावर राखीचे पाऊल; चक्क कपडे घालायलाच विसरली राखी

मुंबई | बॉलिवूडची ‘ड्रामाक्वीन’ तसेच ‘बिग बॉस’ची बायको म्हणून ओळखली जाणारी राखी सावंत (Rakhi Sawant) गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. आदिल खान दुर्रानीने (Adil Khan Durrani) राखीची फसवणूक केल्याने ती प्रचंड दुखावली गेली होती.
त्यानंतर आता राखी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. सलमान खान याला जीवे मारण्याची धमकी दिल्यानंतर राखी सावंत हिने लॉरेंस बिश्नोई (Lawrence Bishnoi) याला सलमान खानला माफ करा म्हणून विनंती केली होती. यावेळी राखी सावंत चक्क बिश्नोई समाजाची माफी मागताना देखील दिसली. यानंतर राखी सावंत हिला ईमेल करण्यात आला. ज्यानंतर अनेक चर्चांना उधाण आले.
सध्या राखीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. ज्यात तिची तुलना उर्फी जावेदसोबत केली जात आहे. राखी सावंत चक्क शर्ट न घालता गाडीमधून उतरताना दिसली. राखी सावंत हिला पाहून सर्वांनाच मोठा धक्का बसला. ज्यावेळी राखी सावंत हिच्या लक्षात आले की, आपण शर्ट न घालता बाहेर आलो तेंव्हा ती लगेचच गाडीमध्ये गेली.
राखी सावंत ज्यावेळी शर्ट न घातला गाडी बाहेर आली, तेंव्हा तिथे पापाराझी होते. यानंतर राखी सावंत हिला चूक लक्षात आली आणि तिने शर्ट घातले. आता राखी सावंत हिचा हा व्हिडीओ तूफान व्हायरल होताना दिसत आहे. राखी सावंत ही फक्त ब्रावर होती. त्यानंतर तिने शर्ट घातले. आता या व्हिडीओनंतर अनेकांना राखी सावंत हिला टार्गेट करण्यास सुरूवात केलीये.