ताज्या बातम्यामनोरंजन

“हिला कोणीतरी आवरा…” राखीच्या रोजच्या ड्राम्यावर संतापले नेटकरी

मुंबई | राखी सावंतने (Rakhi Sawant) डिसेंबर महिन्यात आदिलबरोबर (Adil Khan Durrani) लग्नाचा खुलासा केला. त्यानंतर महिनाभरातच राखीने आदिलवर मारहाणीसह गंभीर आरोप केले आहे. राखीच्या आरोपांनंतर पोलिसांनी त्याला अटक केली आणि कोर्टात हजर केलं. कोर्टाने त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. आदिल कोठडीत गेल्यानंतरही राखीचे आरोप आणि ड्रामा सुरूच आहे. राखीचा रोज काहीना काही व्हिडीओ सोशल मीडियावर दिसतो. यावरून नेटकऱ्यांनी तिला चांगलच ट्रोल केलं आहे.

राखी सावंतचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ती म्हणतेय, ‘माझ्याबरोबर देव आहे, मला देवावर विश्वास आहे’, असं म्हणताना दिसत आहे. यावेळी तिने तिच्या मैत्रिणीचा हात पकडला आहे. ‘मेरे साथ खुदा खडा है’, असं म्हणत ती मागे वाकते आणि पुन्हा उभी होते. तिचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला असून नेटकरी तिला ट्रोल करत आहेत.

राखीच्या या व्हिडीओवर नेटकरी कमेंट्स करून तिला ट्रोल करत आहेत. ‘राखीच्या ड्रामावर तिची मैत्रीणही हसत आहे’. ‘राखीला काम मिळत नसल्याने ती रस्त्यावर असा ड्रामा करत फिरते’. ‘दोन दिवसांनी ती तिच्या मैत्रिणीवरही गुन्हा दाखल करेल’, ‘राखी आता थांबव गं ड्रामा, गेला एक महिना सातत्याने रस्त्यावर तुझा ड्रामा सुरू आहे’, ‘अरे कोणीतरी हिला आवरा, जर तिच्यासोबत काही चुकीचं झालंय तर तिने कोर्टावर विश्वास ठेवावा, दर तासाला रस्त्यावर येऊन ड्रामा का करते ही’? असं एका युजरने म्हटलं आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये