राष्ट्रसंचार कनेक्ट

जिल्ह्यामध्ये रमजान ईद उत्साहात झाली साजरी

तब्बल दोन वर्षांनंतर मुस्लिम बांधवांमध्ये आनंद साजरा

गुलाबपुष्प देऊन मुस्लिम बांधवांचे स्वागत
-न्हावरे : आलेगाव पागा (ता. शिरूर) येथे बहुजन क्रांती संघटना व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ यांच्या वतीने येथील मशीदमध्ये जाऊन सर्व मुस्लिम बांधवांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले व त्यांना रमजान ईदच्या ग्रामस्थांनी शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी तंटामुक्तीचे अध्यक्ष संतोष आरवडे, उपसरपंच अशोक भोसले, रामदास वाघचौरे, वैभव शिंदे, योगीराज मोरे, ज्ञानेश्वर वेताळ या मान्यवरांनी ईदच्या निमित्ताने शुभेच्छापर मनोगत व्यक्त केले.

शिक्रापूर : शिक्रापूर (ता. शिरूर) सह जवळील कोरेगाव भिमा, सणसवाडी, तळेगाव ढमढेरे, पाबळ यांसह आदी गावांमध्ये रमजान ईदनिमित्त सामुहिक नमाज पठन करत एकमेकांना शुभेच्छा देत एक आगळ्या-वेगळ्या उत्साहात मुस्लिम धर्मीयांचा मुख्य व पवित्र असा रमजान ईद सण साजरा करण्यात आला असून कोरोना काळानंतर तब्बल दोन वर्षांनी हा सण उत्साहात साजरा होत असल्याने मुस्लिम बांधवांनी देखील आनंद व्यक्त केला आहे.


शिक्रापूर परिसरातील कोरेगाव भिमा, तळेगाव ढमढेरे, पाबळ अन्य मोठमोठ्या गावांमध्ये नमाज पठणसाठी असणारे ईदगाह व मशीद असलेल्या ठिकाणी मुस्लिम बांधवांचे रमजान ईद निमित्ताने सामुहिक नमाज पठण करण्यात आले. अनेक ठिकाणी इदगाह व मशिदीच्या ठिकाणी गावातील नेमणूक असलेल्या मौलानाच्या नेतृत्वाखाली सामुहिक नमाज पठन करण्यात आले. शिक्रापूरमध्ये मोठे ईदगाह असूनही वाढत्या नागरीकरणामुळे तसेच मुस्लिम बांधवांच्या तीन बैठकी घेत नमाज पठन करण्यात आले आहे. यावेळी सुमारे दीड ते दोन हजार मुस्लिम बांधवांनी शिक्रापूर येथे शांततेत व सामुहिक नमाज पठण केले.


रमजान ईदनिमित्त गाठीभेटी राजगुरूनगर येथे ईद-उल-फित्र (रमजान ईद) मोठ्या उत्साह पूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. येथील ऐतिहासिक दिलावर खान दर्गा मैदानावर सकाळी साडे आठ वाजता सामुदायिकरित्या नमाज अदा करून एकमेकांना ईदनिमित्त मुस्लिम बांधवांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी तालुक्यातील मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.


सासवडला नमाज पठण एक महिन्याच्या कडक उपवासानंतर चंद्रदर्शन झाल्याने आज मंगळवारी सासवड येथील चारशे वर्षांची परंपरा असणार्‍या ईदगाह मैदानावर नमाज पठण करून समस्त मुस्लिम बांधवांनी रमजान ईद साजरी केली. पुरंदरचे आमदार संजय जगताप, माजी नगराध्यक्ष मार्तंड भोंडे, पोलिस निरीक्षक अण्णासाहेब घोलप आदी मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये