श्रीलंकेला मिळाले नवे राष्ट्रपती, देशाला सोडवणार का महागाईच्या विळख्यातून?

कोलंबो | Ranil Wickremesinghe New President Of Sri Lanka – सध्या श्रीलंकेतील जनतेला आर्थिक आणि राजकीय संकटांचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर आज (बुधवार) देशाच्या नव्या राष्ट्रपतींची निवड करण्यात आली आहे. रानिल विक्रमसिंघे यांची श्रीलंकेच्या राष्ट्रपतीपदी निवड करण्यात आली आहे.
रानिल विक्रमसिंघे आता श्रीलंकेचे नवे राष्ट्रपती असतील. पोस्टल बॅलेटद्वारे झालेल्या मतदानात 134 खासदारांनी त्यांच्या बाजूने मतदान केले आहे. सध्या रानिल विक्रमसिंघे हे काळजीवाहू अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळत होते.
दरम्यान, रानिल विक्रमसिंघे हे 1994 पासून युनायटेड नॅशनल पार्टीचे प्रमुख आहेत. ते आत्तापर्यंच चार वेळा श्रीलंकेचे पंतप्रधान झाले आहेत. रनिल यांनी 70 च्या दशकात राजकारणात प्रवेश केला होता. 1977 मध्ये पहिल्यांदा ते खासदार म्हणून निवडून आले होते. तसंच 1993 मध्ये पहिल्यांदा पंतप्रधान होण्यापूर्वी रानिल यांनी उपपरराष्ट्र मंत्री, युवा आणि रोजगार मंत्री यासह इतर अनेक मंत्रालये सांभाळली आहेत.