न्यूड फोटोशूट प्रकरणी रणवीर सिंगची पोलिसांकडून 2 तास चौकशी
![न्यूड फोटोशूट प्रकरणी रणवीर सिंगची पोलिसांकडून 2 तास चौकशी ranveer singh](https://rashtrasanchar.com/wp-content/uploads/2022/08/ranveer-singh-780x470.jpg)
मुंबई | Ranveer Singh Nude Photoshoot Case Chembur Police Recorded His Statement – बाॅलिवूड अभिनेता रणवीर सिंग हा प्रसिद्ध अभिनेत्यांपैकी एक आहे. तसंच तो गेल्या काही दिवसांपासून त्याच्या न्यूड फोटोशूटमुळे चर्चेत आला आहे. रणवीरने एका मासिकासाठी न्यूड फोटोशूट केलं होतं. त्याचे हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते. त्याचबरोबर त्याला या फोटोशूटवरून ट्रोल देखील करण्यात आलं होतं. या सर्व प्रकरणानंतर रणवीर सिंगच्या विरोधात तक्रारही दाखल करण्यात आली होती. रणवीर सिंगविरोधात भादंवि कलम 292, 293, 509 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. नुकतंच या संपूर्ण प्रकरणी मुंबईतील चेंबूर पोलिसांनी त्याचा जबाब नोंदवला आहे.
न्यूड फोटोशूट प्रकरणी रणवीर सिंगविरोधात मुंबईतील चेंबूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी 22 ऑगस्ट रोजी त्याला पोलिसांनी चौकशीसाठी हजर राहण्याची नोटीस दिली होती. मात्र कामात व्यस्त असल्याचं कारण देत त्यानं चौकशीसाठी हजर राहू शकत नाही, असं सांगितले होतं. त्यासोबतच त्याने दोन आठवड्यांची मुदतवाढ मिळावी, अशी मागणीही चेंबूर पोलिसांकडे केली होती. यानंतर आज (29 ऑगस्ट) रणवीरने चेंबूर पोलीस ठाण्यात हजेरी लावली. त्यानंतर त्याने पोलिसात आपला जबाब नोंदवला असून सुमारे 2 तास त्याची पोलिसांकडून चौकशी करण्यात आली.
आज सकाळीच रणवीर सिंगने त्याच्या लीगल टीमसह हजेरी लावली होती. त्यांच्या उपस्थितीत रणवीर सिंगचा जबाब नोंदवण्यात आला. यानंतर तब्बल दोन तासाच्या चौकशीनंतर पोलिसांनी रणवीरला जाण्यास परवानगी दिली. मात्र यापुढे या प्रकरणी पोलीस चौकशीसाठी सहकार्य करावं अशा सूचना त्याला करण्यात आल्या आहेत.