न्यूड फोटोशूट वादावर रणवीर सिंगची प्रतिक्रिया; म्हणाला, “अभिनेता म्हणून…”
![न्यूड फोटोशूट वादावर रणवीर सिंगची प्रतिक्रिया; म्हणाला, "अभिनेता म्हणून..." ranveer singh](https://rashtrasanchar.com/wp-content/uploads/2022/08/ranveer-singh--780x470.jpg)
मुंबई | Ranveer Singh Record His Statement For Nude Photoshoot Case – बाॅलिवूड अभिनेता रणवीर सिंग हा प्रसिद्ध अभिनेत्यांपैकी एक आहे. तसंच तो गेल्या काही दिवसांपासून त्याच्या न्यूड फोटोशूटमुळे चर्चेत आला आहे. रणवीरने एका मासिकासाठी न्यूड फोटोशूट केलं होतं. त्याचे हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते. त्याचबरोबर त्याला या फोटोशूटवरून ट्रोल देखील करण्यात आलं होतं. या सर्व प्रकरणानंतर रणवीर सिंगच्या विरोधात तक्रारही दाखल करण्यात आली होती. या संपूर्ण प्रकरणी मुंबईतील चेंबूर पोलिसांनी त्याचा जबाब नोंदवला आहे.
न्यूड फोटोशूट प्रकरणी रणवीर सिंगविरोधात मुंबईतील चेंबूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी 22 ऑगस्ट रोजी त्याला पोलिसांनी चौकशीसाठी हजर राहण्याची नोटीस दिली होती. मात्र कामात व्यस्त असल्याचं कारण देत त्यानं चौकशीसाठी हजर राहू शकत नाही, असं सांगितलं होतं. त्यासोबतच त्याने दोन आठवड्यांची मुदतवाढ मिळावी, अशी मागणीही चेंबूर पोलिसांकडे केली होती. यानंतर काल (29 ऑगस्ट) रणवीरने चेंबूर पोलीस ठाण्यात हजेरी लावली. त्यानंतर त्याने पोलिसात आपला जबाब नोंदवला असून सुमारे 2 तास त्याची पोलिसांकडून चौकशी करण्यात आली.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, फोटोंवरून वाद सुरू झाल्यापासून रणवीर फार शांत आहे. रणवीरला त्याच्या कायदेशीर टीमने या वादानंतर मीडियासमोर कोणतंही वक्तव्य न करण्याचा सल्ला दिला होता. त्याला याप्रकरणी प्रतिक्रियेसाठी खूप कॉल्स आणि मेसेज आले होते, पण त्याने मौन बाळगत कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. रणवीरच्या वकिलांनी त्याला आपलं म्हणणं थेट पोलिसांसमोर मांडण्यास सांगितलं होतं. याबद्दल मीडियासमोर काहीही न बोलण्यास वकिलांनी सांगितलं होतं. दरम्यान, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संपूर्ण चौकशीदरम्यान रणवीर खूप शांत होता. तसंच ते फोटो आपण अपलोड किंवा प्रकाशित केले नाहीत, असंही त्याने सांगितलं. तसंच या न्यूड फोटोंचे परिणाम काय होतील हे माहित नव्हतं. आपण शूटिंग दरम्यान अभिनेता म्हणून आपली भूमिका बजावली, असंही रणवीरने सांगितलं,