ताज्या बातम्यारणधुमाळी

“मी अनावधानानं…”, शिवरायांच्या एकेरी उल्लेख केलेल्या व्हिडीओवर रावसाहेब दानवेंचं स्पष्टीकरण

मुंबई | Raosaheb Danve – गेल्या काही दिवसांपासून भाजप (BJP) नेत्यांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य करण्याची स्पर्धाच सुरू झाली आहे. शिवरायांवर बोलण्याची मालिका कायम राहिल्यानं राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. भाजपचे आमदार प्रसाद लाड (Prasad Lad) यांनी शिवरायांचा जन्म कोकणात झाला, असं वक्तव्य केलं होतं. त्यानंतर केंद्रीय मंत्री आणि भाजपचे नेते रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांचादेखील एक व्हिडीओ समोर आला. या व्हिडीओमध्ये रावसाहेब दानवे छत्रपती शिवाजी महाराज यांचा एकेरी उल्लेख करताना दिसत आहेत. या व्हिडीओनंतर दानवे यांच्यावर टीका केली जात होती. दरम्यान, हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर दानवेंनी याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे.

यावेळी रावसाहेब दानवे म्हणाले, “मी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बोलताना एकेरी भाषेचा वापर केला, असं वृत्त काही माध्यमांनी दिलं आहे. मात्र, या दोन वर्षांमध्ये मी असं कोणतंही वक्तव्य केलेलं नाही. मी दोन वर्षांपूर्वी नाशिक दौऱ्यावर होतो. त्यावेळी तेथील पत्रकारांनी मला राज्यपालांच्या बोलण्यावर प्रतिक्रिया विचारली होती. त्यावेळी मी अनावधानानं शिवाजी महाराजांचा एकेरी शब्दांमध्ये उल्लेख केला होता. तेव्हा माझ्यावर टीकेची झोड उठली होती. त्यानंतर मी समस्त देशवासीयांची माफी देखील मागितली होती. तसंच तो व्हिडीओ दोन वर्षांपूर्वीचा आहे”.

“हा व्हिडीओ पुन्हा एकदा व्हायरल करण्यात आला आहे. मी ते वक्तव्य काल किंवा आज केल्यासारखं दाखवण्यात येत आहे. मी केलेल्या त्या विधानाची तेव्हाच माफी मागितली होती. आता देखील पुन्हा एकदा मी जनतेची माफी मागतो. आज मी शिवाजी महाराज यांच्याबद्दल असं कोणतंही वक्तव्य केलेलं नाही. मी ते वक्तव्य आज केल्याचं दाखवलं जात असून ते चुकीचं आहे,” असं स्पष्टीकरण रावसाहेब दानवेंनी दिलं आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये