बलात्कार आणि धमकी प्रकरण: गणेश नाईकांच्या अटकेसंदर्भात कोर्ट उद्या देणार निकाल
![बलात्कार आणि धमकी प्रकरण: गणेश नाईकांच्या अटकेसंदर्भात कोर्ट उद्या देणार निकाल ganesh naik](https://rashtrasanchar.com/wp-content/uploads/2022/04/ganesh-naik-780x470.jpg)
मुंबई : काही दिवसांपूर्वी भाजपाचे आमदार गणेश नाईक यांच्यावर एका महिलेने बलात्कार आणि धमकीचा आरोप केला होता. याप्रकरणी कोर्ट उद्या निकाल देणार आहे. गणेश नाईक यांच्यावर गुन्हे दाखल असून शुक्रवारी जामीन अर्जावरील सुनावणी पार पडली. आता कोर्ट उद्या याप्रकरणी निकाल देणार आहे.
गणेश नाईक यांच्याविरोधात लैंगिक अत्याचार प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणात गणेश नाईक यांनी अटकपूर्व जामिनासाठी ठाणे न्यायालयात अर्ज केला होता. या प्रकरणाची सुनावणी शुक्रवारी अतिरिक्त सत्र न्यायाधीश राजेश गुप्ता यांच्या न्यायालयात झाली. त्यांनी या प्रकरणाचे अंतिम आदेश २७ एप्रिलला देण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर आज सुनावणी पार पडली आहे.
कोर्टात सुनावणीदरम्यान गणेश नाईक यांच्या वकिलांमार्फत हा गुन्हा दबावाखाली दाखल झाला असल्याचा युक्तीवाद करण्यात आला. तर गणेश नाईक यांचा ताबा आवश्यक आहे, त्यांच्या गुन्हांचे स्वरूप गंभीर आहे असा युक्तीवाद सरकारी वकिलांनी केला आहे. दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर न्यायाधीश ब्रह्मे यांनी या प्रकरणाचा निकाल उद्या देणार असल्याचं सांगितलं आहे.