मोहम्मद जुबैर यांना सुप्रीम कोर्टाकडून दिलासा; युपी पोलिसांनाच दिले ‘हे’ आदेश
Mohammad Zubair Case : अल्ट न्यूजचे (Alt News) संस्थापक मोहम्मद जुबैर यांना सुप्रीम कोर्टाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. जुबैर यांच्यावर दाखल करण्यात आलेल्या पाच एफआयआरवर दिलासा देत पाचही प्रकरणात जुबैर यांच्यावर कोणतीही कारवाई न करण्याचे आदेश कोर्टाने युपी पोलिसांना दिले आहेत. त्या प्रकरणांवर बुधवारी न्यायालयात सुनावणी होईल तोपर्यंत जुबेर यांच्या विरोधात कारवाई करू नये असे स्पष्ट शब्दांत सुप्रीम कोर्टाने सांगितले आहे.
मोहम्मद जुबैर हे अल्ट या फॅक्टचेक न्यूज एजेन्सीचे संस्थापक आहेत. लोकांच्या धार्मिक भावना भडकवण्याच्या कारणाने जुबैर यांच्यावर अनेक ठिकाणी एफआयआर दाखल करण्यात आल्या आहेत. त्यांच्या विरोधात दाखल करण्यात आलेल्या काही प्रकरणात त्यांना दिल्ली न्यायालयाकडून दिलासा मिळाला होता. मात्र, जुबैर यांच्याविरोधात सारख्याच प्रकरणांत अनेक ठिकाणी एफआयआर दाखल करण्यात येत असल्याचे म्हणत जुबैर यांच्याकडून इतर एफआयआर रद्द करण्यात यावेत अशी याचिका सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आली होती.
जुबैर यांच्याकडून करण्यात आलेल्या एफआयआर रद्द करण्याच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात सुनावणी करण्यात आली आहे. एकसारख्याच प्रकरणांत अनेकवेळा एफआयआर दाखल करणे हे चुकीचे आहे असे म्हणत, युपी पोलिसांनी सुप्रीम कोर्टाकडून सुनावणी करण्यापर्यंत जुबैर यांच्यावर कोणतीही कारवाई न करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे जुबैर यांना मोठा दिलासा मिळाला आहे.