रोटरी सॅटेलाईट क्लब पुणे ईस्टच्या अध्यक्षपदी रेश्मा शाह

पुणे : रोटरी क्लब ऑफ पुणे ईस्टचा 2022-23 चा पदग्रहण सोहळा नुकताच पार पडला. रोटेरियन रेश्मा उदय शाह यांनी अध्यक्षपदाची सूत्रे मावळत्या अध्यक्ष रोटेरियन सुजाता जोशी यांच्याकडून स्वीकारली, तर रोटेरियन डॉ. मंजू नुले यांनी सचिवपदाची सूत्रे मावळत्या सचिव रो. रेश्मा शाह यांच्याकडून स्वीकारली. 2022-23 च्या संचालक मंडळातील सदस्यांनीदेखील पदभार स्वीकारला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी 2024-25 च्या प्रांतपाल रो. डी. जी. एन. शीतल शाह उपस्थित होते. रोटरी क्लब ऑफ पुणे ईस्टमधील अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. रोटरी सॅटेलाईट क्लब ऑफ पुणे ईस्ट यांच्या वतीने 50 पर्यावरणपूरक रोपे सर्व उपस्थितांना देण्यात आली व वृक्षारोपण केले. याचबरोबर येत्या वर्षात 2022-2023 मध्ये गरजू लोकांसाठी हॅप्पी फॅमिली किट, शालेय विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी वस्तूंचे वाटप, हेल्थ कॅम्प असे अनेक उपक्रमांचे नियोजन आहे.