क्रीडाताज्या बातम्यादेश - विदेश

स्लाॅग ओव्हरमध्ये 52 धावा, बुमराह आणि हर्षलबद्दल रोहित शर्माचे वक्तव्य, म्हणाला…

हैदराबाद : (Rohit Sharma On Bumrah And Patel) भारत विरुद्ध ऑस्टेलिया तिसऱ्या टि 20 सामन्यात ऑस्ट्रेलियाचा 6 गडी राखून पराभव करत तीन सामन्यांच्या मालिकेत 2-1 ने मालिका खिशात घातली. मात्र, भारतीय संघ गोलंदाजी करताना स्लाॅग ओव्हरमध्ये पुन्हा भारतील गोलंदाजांनी 52 धावा दिल्या. भारताने ऑस्ट्रेलियाचे 187 धावांचे टार्गेट 19.5 षटकात पार केले. ऑस्ट्रेलियाने पॉवर प्लेमध्ये चांगली फलंदाजी केली होती. त्यानंतर भारतीय फिरकीपटूंनी ऑस्ट्रेलियाच्या धावगतीला चांगला ब्रेक लावला होता.

दरम्यान, यावर भारतीय कर्णधार रोहित शर्माने स्लाॅग ओव्हरमधील भारताचे गोलंदाज बोलताना मोठं वक्तव्य केलं आहे. भारतासाठी स्लाॅग ओव्हरसह काही विभाग डोकेदुखी ठरु शकतात. दुखापतीतून सावरत हर्षल पटेल आणि जसप्रीत बुमराह दीर्घ काळानंतर आंतरराष्ट्रीय सामने खेळत आहेत. त्यामुळे मी स्लाॅग ओव्हरची जास्त चिंता करत नाही. दोन्ही गोलंदाच मोठ्या ब्रेकनंतर खेळत आहेत. त्यामुळे त्यांना पाहिजे तसा लय मिळाला नाही, त्याला थोडा वेळ लागेल आणि ते लवकरच लय पकडतील असं मला वाटत आहे असं रोहित म्हणालाय.

तो म्हणला की, ‘आम्ही ऑस्ट्रेलियाविरूद्ध चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न केला. सर्वात सकारात्मक गोष्ट म्हणजे विविध खेळाडूंनी मग ते गोलंदाज असो किंवा फलंदाज त्यांनी आपली कामगिरी उंचावली. ज्यावेळी तुम्ही या कामगिरीचं अवलोकन करता त्यावेळी तुम्हाला अशी कामगिरी पाहून आनंद होतो.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये