“चंद्रकांत पाटलांनी डोक्याला तेल लावून ध्यान करावं”

पुणे – Rupali Thombare on Chandrakant Patil | भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा आज वाढदिवस आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून पाटलांच्या वाढदिवसांचं निमित्त साधत त्यांना खोचक अशा शुभेच्छा दिल्या आहेत. त्यासोबतच राष्ट्रवादीच्या नेत्या रूपाली ठोंबरे यांनी यांनी चंद्रकांत पाटलांवर निशाणा साधला आहे.
रूपाली पाटील यांनी चंद्रकांत पाटील यांना तेलाची बाटली, साबण, ब्रश आणि गोळा केलेला निधी कुरिअरने पाठवला आहे. त्यासोबतच त्यांनी चंद्रकांत पाटलांना खोचक असा टोलाही लगावला आहे.
दरम्यान, चंद्रकांत पाटलांनी हिमालयात गेल्यावर डोक्याला तेल लावावे आणि ध्यान करावे. यामुळे त्यांच्या मनाला आणि डोक्याला निश्चित शांती मिळेल. त्यासोबतच त्यांनी दिलेला शब्द पाळला पाहिजे, असं रूपाली ठोंबरे पाटील यांनी म्हटलं आहे. यावर पाटील काय प्रत्युत्तर देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.