ताज्या बातम्यादेश - विदेश

युक्रेनचे रशियाला त्यांच्याचं भाषेत चोख उत्तर झेलेन्स्की म्हणाले…

किव : मागिल अनेक दिवसांपासून युक्रेन-रशिया युद्ध सुरुच आहे. रशियाने आतापर्यंत युक्रेनची अनेक मोठी शहरे जमिनदोस्त केली आहे. सध्या पुर्वेकडील डोनबास या बंडखोरांच्या ताब्यातील प्रदेशासाठी लढाई चालू आहे. त्यावर आता रशियाने युक्रेनियन सैनिकांना तत्काळ शस्ञे खाली टाकण्यास सांगितला आहे. माञ, रशियाने-युक्रेनवर हल्ला केल्यानंतरही युक्रेनकडून त्यावर जोरदार प्रत्युत्तर देत आमचे सैनिक मागे हटणार नाही, असं युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांनी रशियाला त्यांच्याचं भाषेत चोख उत्तर दिलं आहे.

झेलेन्स्की यांचे सल्लागार ओलेक्सी अरेस्टोव्हिच यांनी शेवटच्या क्षणापर्यंत प्रतिकार करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. डोनबासची लढाई काल सुरू झाली. आम्ही पूर्णपणे लढा देऊ. ही लढाई रशियाला जिंकता येणार नाही, असं ओलेक्सी म्हणाले. शक्य असेल तर राजनैतिक पातळीवर या युद्धाचा शेवट करण्यास युक्रेन तयार आहे. पण कोणत्याही परिस्थितीत आम्ही शरणागती पत्‍करणार नाही, असं युक्रेनकडून ठामपणे सांगण्यात आलं.

रशियाकडून होणाऱ्या सततच्या हल्ल्यांनी सर्व सीमा पार केल्यास वाटाघाटीतून शांतता प्रस्थापित करण्याचे सर्व प्रयत्न निष्फळ ठरतील. युक्रेनी सैनिकांच्या फौजा सर्व ताकदीनिशी प्रत्युत्तर देत आहेत, मात्र प्रचंड विनाशामुळे मारिउपोल आता पूर्वीप्रमाणे उभे राहू शकणार नाही. हे भरुन काढणे युक्रेन खुप कठीण जाणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये