पुणे

मेट्रोमुळे देश प्रगतिपथावर: एस. चोकलिंगम

मेट्रो प्रकल्प हा केवळ विशिष्ट शहराच्या नव्हे तर पूर्ण देशाला प्रगतीपथावर नेणारा असतो. त्यातच पुणे हे देशविदेशातील विद्यार्थ्यांसाठी प्रमुख महत्वाचे शैक्षणिक केंद्र म्हणून आकाराला आलेले असल्याने येथील विद्यार्थ्यांना वेगवान, सुरक्षित, प्रदूषणमुक्त परिवहन मिळवून देणारी मेट्रो रेल्वे अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.

पुणे ( PuneMetro) : हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो लाइन ३ ही विद्यापीठाला देखील जोडणारी असल्याने तिचे आणखी आगळे महत्त्व आहे. तसेच प्रवासादरम्यान विद्यार्थ्यांच्या अध्ययनात पाठबळ मिळावे या दृष्टीने पुणे मेट्रो लाइन ३ च्या गाड्यांमध्ये वाय-फाय सुविधा उपलब्ध करून देण्याचा विचार अवश्य करावा, असे मत यशदाचे महासंचालक एस. चोकलिंगम यांनी व्यक्त केले.

‘आयएएस डॉ. दिवसे’ आणि बैलगाडीचा प्रवास
आयएएस अधिकारी असल्यामुळे तुमच्या दिमतीला मोठमोठ्या आलिशान गाड्या असतील, परंतु तुम्ही आजवर कधी बैलगाडीतून प्रवास केला आहे का? या प्रश्नाला उत्तर देताना पीएमआरडीएचे आयुक्त डॉ. सुहास दिवसे म्हणाले, मी जरी पदवीने आयएएस असलो, तरी मनाने आजही वांगी गावचा एक शेतकरीच आहे. मी बैलगाडीतून फक्त भरपूर प्रवासच केला नसून बैल खरेदीही केली आहे. आजही माझ्या घरी दिवसाची सुरुवात रोज शेती, बैल, बियाणे, पीक याच विषयावर चर्चा करून होत असते.

जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून हिंजवडी ते शिवाजीनगर मार्गावरील पुणे मेट्रो लाइन ३ च्या वतीने रविवारी ताथवडे कास्टींग यार्ड येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. वेळी प्रमुख पाहुणे म्हणून चोकलिंगम बोलत होते. हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोसाठी स्थापित विशेष उद्देश कंपनी पुणे आयटी सिटी मेट्रो रेल लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी आलोक कपूर, तसेच पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे (पीएमआरडीए) आयुक्त डॉ. सुहास दिवसे यावेळी उपस्थित होते.

पुणे आयटी सिटी मेट्रो रेल लिमिटेडच्या संचालक नेहा पंडित, प्रकल्प संचालक अक्षय शर्मा यांनी यावेळी वृक्षारोपण केले. डॉ. सुहास दिवसे यांनी मेट्रो व रिंग रोडसारख्या महत्त्वाच्या प्रकल्पांबाबत आणि पुण्यातील ऐतिहासिक वारसा व औद्योगिक विकास यांची सुयोग्य सांगड घालण्यासाठी पीएमआरडीए करीत असलेल्या प्रयत्नांबाबत माहिती दिली. आलोक कपूर यांनी हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो लाइन ३ चे पुणेकरांसाठी असलेले महत्त्व विशद करून सांगितले, तसेच मेट्रोच्या या मार्गिकेवर राबवण्यात येणार्‍या हरित उपक्रमांची माहिती दिली. पीआयटीसीएमआरएलच्या संचालक नेहा पंडित यांनी उपस्थितांचे आभार मानले. निवेदक नितीश कामदार यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये