बंडखोरांसाठी ‘मातोश्री’चे दार अजूनही उघडे; शिंदे गटातील कुरबुरीवर सेना नेत्याचं विधान!
![बंडखोरांसाठी 'मातोश्री'चे दार अजूनही उघडे; शिंदे गटातील कुरबुरीवर सेना नेत्याचं विधान! Rebel Shinde Group](https://rashtrasanchar.com/wp-content/uploads/2022/08/Rebel-Shinde-Group--780x470.jpg)
मुंबई : (Sachin Ahir On Rebel MLA) मागच्या काही दिवसांपासून शिंदे गटाकडून ठाकरे कुटुंबाचे समर्थन करणारे विविध वक्तव्य करण्यात येत आहे. नुकतेच शुक्रवारी शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी आदित्य ठाकरे यांची बाजू घेत भाजप नेते नारायण राणे यांच्यावर टीका केली. त्यांच्या या टिकेमुळे शिंदे गट आणि भाजप यांच्यात कुरबुरी सुरू झाली आहे. त्यातच आज शिवसेनेच्या नेत्यांनी शिंदेंसोबत गेलेल्या बंडखोरासाठी अजुनही मातोश्रीची दारं खुले असल्याचं म्हटलं आहे.
शिवसेना नेते सचिन अहिर म्हणाले की, युतीमध्ये काय चाललं हे लवकरच कळेल. एकत्र येण्याची भूमिका घेणं आधीच कळले असते तर बरे झाले असते. बंडखोर आमदारांना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे नेतृत्वा मान्य असेल तर, त्यांच्यासाठी शिवसेनेचे दरवाजे अजुनही खुले आहेत. त्यामुळे अहिर यांच्या सुराला बंडखोर आमदार साथ घालून पुन्हा मातोश्रीवर परतणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
दरम्यान, शिंदे गटाचे प्रवक्ते दिपक केसरकर यांचा निलेश राणेंकडून खरपुस समाचार घेण्यात आला आहे. निलेश यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे की, दिपक केसरकर म्हणतो मी राणेंबरोबर काम करायला तयार आहे, नोकरी मागायची आहे तर नीट मागा, १ तारखे पासून आमच्याकडे ड्रायव्हर ची जागा रिकामी आहे. अशा प्रकारची खालच्या पातळीवर केसरकरांवर टिका करण्यात आली आहे. त्यामुळे शिंदे गट आणि राणे कुटुंबातील वाद आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.