ताज्या बातम्यामनोरंजन

सलीम खान आणि सलमान खान यांना जीवे मारण्याची धमकी!

मुंबई | Salman Khan And Salim Khan Threatened To Kill – बॅालिवूडचा भाईजान सलमान खान आणि प्रसिद्ध लेखक सलीम खान या पिता-पुत्रांना जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. यामुळं सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे. तसंच याप्रकरणी वांद्रे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एएनआयनं यासंदर्भात वृत्त दिलं आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, सलीम खान सकाळी जॅागिंगला गेले असताना एका बाकड्यावर ते विश्रांतीसाठी बसले होते. या बाकड्यावर धमकीचं पत्र ठेवलं होतं. या पत्रात सलमान खान याचा सिद्धू मुसेवाला करुन टाकू असं म्हटलं आहे. सकाळी 7:30 ते 8:00 च्या सुमारास सलीम खान यांना हे पत्र मिळाले. हे धमकीच पत्र मिळाल्यानंतर सलीम खान यांनी वांद्रे पोलीस स्थानकात एका अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा नोंदवला आहे. 

दरम्यान, पंजाब पोलिसांनी सुरक्षा व्यवस्थेत कपात केल्यानंतर लगेचच गायक मुसेवाला यांच्यावर हल्लेखोरांनी गोळ्यांचा वर्षावर करत हत्या केली होती. काही दिवसांपूर्वीच घडलेल्या या घटनेमुळं सलमान आणि त्याच्या वडिलांनी मिळालेल्या धमकीकडं पोलीस गांभीर्यानं पाहतं असून कसून तपास केला जात असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये