टायगर आणि पठाण येणार आमने सामने, तोडणार बाॅलिवूडचे सगळे रकाॅर्ड

मुंबई | Shah Rukh Khan And Salman Khan – बाॅलिवूडचा सुपरस्टार शाहरूख खानच्या (Shah Rukh Khan) ‘पठाण’ (Pathaan) या चित्रपटानं बाॅक्स ऑफिसवर (Box Office) धुमाकूळ घातला आहे. हा चित्रपट सुपरहिट ठरला असून त्यानं जगभरात 900 कोटींहून अधिक कमाई केली आहे. या चित्रपटाचं सुपरहिट होण्याचं विशेष कारण म्हणजे सलमान (Salman Khan) आणि शाहरूख या दोघांंचं चित्रपटात एकत्र दिसणं. त्यामुळे सलमान आणि शाहरूखचे चाहतेही त्यांना एकत्र पाहून खूश झाले होते.
आता पुन्हा एकदा शाहरूख आणि सलमान एकत्र दिसणार आहेत. ‘टायगर 3’ (Tiger 3) या आगामी चित्रपटात सलमानसोबत शाहरूख एक धमाल सीन करताना पाहायला मिळणार आहे. त्यासाठी एक महागडा सेटही लावला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. अशातच शाहरूख-सलमानच्या चाहत्यांसाठी आणखी एक खुशखबर आहे.
‘टायगर 3’ नंतर सलमान आणि शाहरूखचा आणखी एक नवीन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. ‘टायगर वर्सेज पठाण’ हे त्यांच्या आगामी चित्रपटाचं नाव आहे. ते या प्रोजेक्टसाठी एकत्र येणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. बाॅलिवूड हंगामाच्या रिपोर्टनुसार, या आगामी चित्रपटात शाहरूख आणि सलमान आमने सामने येणार आहेत. या चित्रपटासाठी जबरदस्त पैसा खर्च केला जाणार असून या चित्रपटाची तयारी सुरू झाली आहे.
हा चित्रपट यशराज फिल्म्सच्याच स्पाय युनिव्हर्समध्ये येणार आहे. तसंच यश राज फिल्म्स याची अत्यंत थाटात घोषणा करणार आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पुढच्या वर्षी म्हणजेच 2024 मध्ये सलमान आणि शाहरुख या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात करणार आहेत. ‘टाइगर वर्सेज पठान’ हा चित्रपट बॉलिवूडच्या इतिहासातील सर्वात महागडा चित्रपट असणार आहे. त्यामुळे आता शाहरूख-सलमानचे चाहते चांगलेच उत्सुक झाले आहेत.