“उपोषण थांबवा लढा थांबवू नका”… संभाजी भिडेंनी घेतली मनोज जरांगे पाटील यांची भेट !
!["उपोषण थांबवा लढा थांबवू नका”… संभाजी भिडेंनी घेतली मनोज जरांगे पाटील यांची भेट ! 0 21](https://rashtrasanchar.com/wp-content/uploads/2023/09/0-21-780x470.jpg)
जालना : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील जालनामध्ये १५ दिवसांपासून आमरण उपोषणाला बसले आहेत. त्यात आता आंदोलनस्थळी संदीपान भुमरे, अर्जुन खोतकर यांच्यासह संभाजी भिडे ( sambhaji bhide )आले होते. त्यावेळी संभाजी भिडे यांनी मनोज जरांगे पाटील यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला आणि आम्ही तुमच्या पाठीशी आहे असं आश्वासन देखील करण्यात आलं. “ही लढाई एक घाव दोन तुकड्यांची नाही. जसं पाहिजे तसं, आरक्षण मिळालं पाहिजे” असं म्हणत “अजित पवार काळीज असलेला माणूस. शिंदे लबाड नाहीत. फडणवीस बेईमानी करणार नाहीत. उपोषणा थांबवा, लढा थांबवू नका” पुढची जबाबदारी माझ्यावर टाका असं संभाजी भिडे या वेळेस म्हणाले.
“मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत, आम्ही सगळे तुमच्यासोबत आहोत. मी इथे दिखाव्यासाठी आलेलो नाही. मराठा समजाला पाहिजे तसं आरक्षण मिळालं पाहिजे. तुम्ही जे करताय ते 101 टक्के योग्य आहे. आरक्षणाचा प्रश्न हा राजकारण्याच्या हातात आहे आणि आता जे सत्तेमध्ये आहेत त्यात एकनाथ शिंदे लबाड नाहीत आणि देवेंद्र फडणवीस बेईमानी करणार नाहीत व अजित पवार हे काळीज असलेला माणूस आहेत त्यामुळे हे उपोषण मागे घेऊन आरक्षणाचा लढा सुरु ठेवावा. असे संभाजी भिडे म्हणजे.
आपलं कौतुक करावं एवढं चांगल आंदोलन आहे इथे मी तुम्हाला उपदेश करायला नाही आलो तुम्ही जे करताय ही धर्माची सेवा असून त्याच फळ तुम्हाला नक्की मिळेल. मराठा समाज हा हिंदुस्थानचा पाठीचा कणा, आत्मा असलेला समाज आहे. उपोषण थांबवा लढा थांबवू नका” असं आवाहन संभाजी भिडे ( sambhaji bhide ) यांनी मनोज जरांगे पाटील यांना केलं.