ताज्या बातम्यामहाराष्ट्ररणधुमाळी

उद्धव ठाकरेंसाठी जीव द्यायला तयार असणारा आमदारही नॉट रिचेबल!

मुंबई – Maharashtra Politics | रात्री विधानपरिषदेच्या निकानंतर शिवसेनेचे महत्वाचे समजले जाणारे नेते एकनाथ शिंदे शिवसेनेच्या काही आमदारांना घेऊन गुजरातमध्ये रवाना झाल्याने महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप आलेला आहे. राजकीय नेत्यांमध्ये चर्चा, बैठका आणि भेटीगाठीला वेग आलेला आहे. एकनाथ शिंदे हे शिवसेनेच्या तीस पेक्षा जास्त आमदारांना घेऊन रवाना झालेले आहेत. त्या आमदारांमध्ये शिवसेनेसाठी जीव ओवाळून टाकणारा आमदार देखील आहेत.

शिवसेना हा पक्ष कट्टर कार्यकर्त्यांमुळे ओळखला जातो. मात्र शिवसेनेचे कट्टर नेते समजले जाणारे आमदार संदीपन भुमरे देखील एकनाथ शिंदे यांच्यासोबत असल्याची माहिती आहे. आमदार संदीपान भुमरे उद्धव ठाकरेंच्या शब्दापलीकडे कधीही जाणार नाही असं म्हणत. मात्र ते नॉट रिचेबल असल्याने शिवसेनेला मोठ्ठा धक्का बसला आहे.

आमदार संदीपान भुमरे एका मुलाखतीत ‘उद्धव ठाकरेंनी सांगितल्यास सातव्या मजल्यावारूनही उडी मारू’ असं म्हटले होते. मात्र सध्या शिवसेना मोठा संघर्ष करत असताना ते नॉट रिचेबल असल्याने शिवसेनेचा विश्वासघात तर झाला नाही ना अशी चर्चा राजकीय वातावरणात सुरु आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये