सांगली जिल्हा हादरला! एकाच कुटुंबातील 9 जणांनी संपवलं जीवन
![सांगली जिल्हा हादरला! एकाच कुटुंबातील 9 जणांनी संपवलं जीवन Sangli Sucide 1](https://rashtrasanchar.com/wp-content/uploads/2022/06/Sangli-Sucide-1-780x470.jpg)
सांगली – Family Suicide Sangli | महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यामध्ये एकाच कुटुंबातील 9 जणांनी आपलं जीवन संपवलं आहे. सांगलीमधील मिरजपासून (Family Suicide Sangli Miraj) जवळ असलेल्या म्हैसाळमधील (Mhaisal) अंबिकानगरनध्ये ही घटना घडली आहे. दोन भावांच्या कुटुंबियांनी विष घेऊन आत्म.हत्या केली असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.
माणिक वनमोरे आणि पोपट वनमोरे (Manik Vanmore and Popat Vanmore) या दोन भावांनी रविवारी रात्री आपल्या कुटुंबासोबत विष घेतलं. मृतांमध्ये आई, पत्नी आणि मुलांचा समावेश आहे. सोमवारी सकाळी ही घटना उघडकीस आली आहे.
दरम्यान, एका ठिकाणी सहा तर दुसऱ्या ठिकाणी तीन जणांचे मृतदेह सापडले आहेत. माणिक येलाप्पा वनमोरे (डॉक्टर), आक्काताई वनमोरे (आई), रेखा मानिक वनमोरे (बायको), प्रतिमा वनमोरे (मुलगी), आदित्य वनमोरे (मुलगा), पोपट येलाप्पा वनमोरे (शिक्षक), अर्चना वनमोरे (पत्नी), संगीता वनमोरे (मुलगी), शुभम वनमोरे (मुलगा) अशी नावे आहेत. पोलीस पुढील तपास करत आहे.