ताज्या बातम्यारणधुमाळी

माजी मंत्र्याचा शिवसेनेत प्रवेश अन् उद्धव ठाकरेंनी केली ‘ही’ मोठी घोषणा!

मुंबई | Uddhav Thackeray – एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी 40 आमदारांसह बंडखोरी केल्यानंतर शिवसेनेत चांगलीच फुट पडली. त्यानंतर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या नेतृत्वाखाली राज्यात नवीन सरकार स्थापन झालं. तसंच शिंदे गटानं शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण चिन्हावरही दावा केला. मात्र, निवडणूक आयोगानं या दोन्ही गोष्टी गोठवल्यामुळे ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्यात आरोप-प्रत्यारोपाचं राजकारण सुरू झालं आहे. यादरम्यान आज (20 ऑक्टोबर) यवतमाळमधील नेते संजय देशमुख यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात प्रवेश केला आहे. संजय देशमुख (Sanjay Deshmukh) यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या उपस्थितीत हाती शिवबंधन बांधले. देशमुख यांनी ठाकरे गटात प्रवेश केल्यानंतर उद्धव ठाकरेंनी पक्षविस्ताराच्या दृष्टीने महत्त्वाची घोषणा केली आहे. मी पोहरा देवीचं दर्शन घेण्यासाठी नक्की येणार आहे. मेळाव्यासाठी तुम्ही तारीख ठरवा. मी आलोच, असं ठाकरे म्हणाले आहेत.

यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले, महाराष्ट्रातील संस्कारी माणसांना जे झालं ते पटलेलं नाही. ज्यांचा आपल्याशी संबंध येणार नाही, तसे लोक आपल्यासोबत येत आहेत. वेगवेगळ्या धर्माचे लोक सोबत येत आहेत. तुम्ही फक्त लढा. जे होत आहे ते आम्हाला पसंद नाही, असं मला लोक म्हणत आहेत. या देशातील लोकशाही वाचवण्याचा हा प्रयत्न आहे.

माझं काय होणार, शिवसेनेचं काय होणार? हे ठरवणारे तुम्ही आहात. मला त्याची चिंता नाही. मात्र देशाचं काय होणार? देशात लोकशाही राहणार आहे की नाही? हा प्रश्न प्रत्येकानं स्वत:ला विचारला पाहिजे, असं उद्धव ठाकरे कार्यकर्त्यांना उद्देशून म्हणाले. तसंच मी पोहरा देवीच्या दर्शनाला येणारच आहे. कधी मेळावा घ्यायचा, कुठे घ्यायचा हे ठरवा. मी येणार आहे, असंही ठाकरे यांनी म्हटलं आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये