ताज्या बातम्यारणधुमाळी

महिला आमदारांना संजय राऊत वेश्या म्हणाले, ‘या’ बंडखोर आमदाराचा गंभीर आरोप

औरंगाबाद | Sandipan Bhumare On Sanjay Raut – एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या बंडखोर आमदारांना सोबत घेऊन भाजपसोबत सरकार स्थापन केलं आहे. मात्र गेल्या दोन आठवड्यात घडलेल्या राजकीय घडामोडींबाबत आरोप-प्रत्यारोप सुरूच आहेत. यामध्ये ठाकरे सरकारमध्ये मंत्री राहिलेले आणि आता शिंदे गटात महत्वाची भूमिका बजावणारे आमदार संदिपान भुमरे यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. संजय राऊत यांनी महिला आमदारांना वेश्या म्हंटलं असल्याचा आरोप भुमरे यांनी केला आहे. त्यांच्या या आरोपाने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. 

संदिपान भुमरे हे मंगळवारी पहिल्यांदाच जिल्ह्यात परतले. यावेळी माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, संजय राऊत यांनी आमच्यावर खालच्या पातळीची टीका केली. त्यांच्या तोंडातून असे शब्द निघणे म्हणजे चांगलं नाही. त्यांनी फक्त माझ्या एकट्यावर टीका केली नाही तर एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेल्या सर्व आमदारांवर टीका केली. राऊत आम्हाला रेडे म्हणाले, कुत्रे म्हणाले, यांचे मृतदेह येतील असंही म्हणाले. एवढंच नाही तर महिला आमदारांना वेश्या असल्याचं राऊत म्हणाले असल्याचा गंभीर आरोप भुमरे यांनी केला आहे.

पक्षाने मला मोठं केलं हे ठीक आहे. पण मी सुद्धा पक्षासाठी खूप काही केलं आहे. आम्ही थेट आमदार झालो नाही. पक्षवाढीसाठी सर्वांनीच कामं केली आहेत. गेली 35 वर्षे पक्षासाठी मी काम केलं असून, त्यासाठी लाठ्याकाठ्या खाल्ल्या आहेत. त्यामुळे आम्हाला कुणीही काहीही शिकवायची गरज नाही, असंही भुमरे यांनी म्हटलं आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये