ताज्या बातम्यामहाराष्ट्ररणधुमाळी

संजय राऊतांच्या ‘त्या’ वक्तव्यामुळे अधिवेशनात मोठा गदारोळ, सभागृहात हक्कभंग आणण्याची मागणी

मुंबई | Sanjay Raut – सध्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) कोल्हापूर (Kolhapur) दौऱ्यावर आहेत. यावेळी कोल्हापूरात पोहोचताच त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना शिंदे सरकारवर टीकास्त्र सोडलं. डुप्लिकेट शिवसेनेचं (Shivsena) हे विधीमंडळ नसून चोरमंडळ आहे, असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं आहे. त्यामुळे राऊतांनी केलेल्या या वक्तव्यावरुन आज (1 मार्च) अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या (Maharashtra Budget Session) तिसऱ्या दिवशी सभागृहात मोठा गदारोळ सुरु आहे.

संजय राऊतांच्या वादग्रस्त विधानानंतर भाजप (BJP) आणि शिंदे गटाचे (Shinde Group) आमदार आक्रमक झाले आहेत. तसंच भाजप नेते अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी राऊतांवर विधीमंडळ सभागृहात हक्कभंग आणण्याची मागणी केली आहे. अशातच, सभागृहात मोठा गदारोळ झाल्यामुळे सभागृहाचं कामकाज 10 मिनिटांसाठी तहकूब करण्यात आलं आहे.

संजय राऊतांनी चोरमंडळ असा उल्लेख केल्यानंतर अतुल भातखळकरांनी त्यांच्याविरोधात हक्कभंग आणण्याची मागणी केली आहे. तसंच शिंदे गटाचे भरत गोगावले यांनीही राऊतांना अपशब्द वापरला. यादरम्यान राऊतांच्या वक्तव्यासंदर्भात बोलताना अपशब्द वापरल्यानंतर ठाकरे गटाचे रवींद्र वायकर यांनी आक्षेप घेत गोगावलेंवर निशाणा साधला. त्यामुळे सभागृहात गोंधळ झाला.

नेमकं काय म्हणाले संजय राऊत?

“कसबा पोटनिवडणुकीत यंत्रणांचा गैरवापर करण्यात आला आहे. पोलीस आणि कायदा कोणाच्या मर्जीनं नाचत आहेत? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तसंच 2024 ला सगळ्यांचा हिशेब देऊ, असा इशाराही त्यांनी दिला. जनतेच्या गर्जनेला बळ देण्यासाठी आम्ही फिरत आहोत. बाळासाहेबांनी आम्हाला पदं दिली आहेत, त्यामुळे त्यांनी आम्हाला पदावरुन काढलं, तरी आम्ही अशी पदं ओवाळून टाकतो. डुप्लिकेट शिवसेनेचं हे विधीमंडळ नसून चोरमंडळ आहे”, अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे. 

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये