ताज्या बातम्यामहाराष्ट्ररणधुमाळी

संजय राऊतांना संसदीय नेतेपदावरून हटवलं, ‘या’ नेत्याची केली नियुक्ती

मुंबई | Sanjay Raut – ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना शिवसेनेच्या (Shivsena) संसदीय नेतेपदावरून हटवण्यात आलं आहे. आता या पदावर शिंदे गटाचे खासदार गजानन किर्तीकर (Gajanan Kirtikar) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला (Om Birla) यांना पत्र लिहून दिली आहे.

फेब्रुवारी महिन्यात मुंबईत शिवसनेच्या (शिंदे गट) कार्यकारिणीची महत्त्वाची बैठक झाली होती. या बैठकीत गजानन किर्तीकर यांची संसदीय नेतेपदी निवड करण्यात आली होती. त्यानंतर 21 फेब्रुवारीच्या बैठकीत त्यासंबंधीचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला होता. आता यासंदर्भातली अधिकृत माहिती लोकसभा अध्यक्षांना पत्राद्वारे देण्यात आली आहे.

दरम्यान, निवडणूक आयोगानं शिवसेना पक्षनाव आणि धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह शिंदे गटाला बहाल केलं. त्यानंतर शिंदे गटानं तीनच दिवसांनी पक्षाच्या कार्यकरारिणीची बैठक बोलावली होती. या बैठकीत संजय राऊतांना संसदीय नेतेपदावरून हटवून त्याजागी गजानन किर्तीकरांची निवड करण्यात आली होती.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये