ताज्या बातम्यादेश - विदेशमहाराष्ट्ररणधुमाळी

सुरतमधून परत येऊ इच्छिणाऱ्या आमदारांबाबत संजय राऊतांकडून धक्कादायक माहिती समोर

मुंबई- Maharashtra Politics | शिवसेनेमध्ये एका रात्रीत मोठा भूकंप आलेला आहे. राज्याचे नगरविकास मंत्री शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे हे परिषदांच्या निवडणुक निकालानंतर शिवसेनेतील काही आमदारांना घेऊन गायब झालेले आहेत. त्यामुळे सत्ताधारी शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. एकनाथ खडसे शिवसेनेचे नेतृत्व असलेले उद्धव ठाकरे यांच्यावर नाराज असल्याची माहिती आहे. राज्यातील महाविकास आघाडी सरकार पडेल की काय? अशी चर्चा राजकीय वातावरणात सुरु आहे. दरम्यान एक धक्कादायक दावा संजय राऊत यांनी केला आहे.

एकनाथ शिंदे शिवसेनेच्या आमदारांना घेऊन गुजरातला रवाना झालेले आहेत. ते गुजरात मधील हॉटेल ली मारिडिअन नावाच्या हॉटेल मध्ये आहेत. त्यांना सात प्रकारची सुरक्षा लावण्यात आली असल्याची माहिती संजय राऊत यांनी दिली होती. त्यानंतर संजय राऊत यांनी हॉटेल मधील अनेक आमदार परत येऊ इच्छित आहेत मात्र त्यांना बाहेर येऊ दिलं जात नाही. त्यांच्यावर दहशतवादी, खुनी हल्ले होत आहेत. अशी माहिती संजय राऊत यांना मिळाली असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

एकनाथ शिंदे यांची समजूत काढण्यासाठी शिवसेनेचे मिलिंद नार्वेकर सुरतला भेटीसाठी गेले आहेत. त्यांच्या भेटीनंतर एकनाथ शिंदे नेमका काय निर्णय घेतील याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये