Top 5महाराष्ट्रमुंबई

फडणवीस आमच्या फंद्यात पडू नका- संजय राऊत 

मुंबई – Sanjay Raut on Devendra Fadnavis | एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे शिवसेनेच्या अस्तित्त्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. या सर्व राजकीय भूकंपामागे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे पडद्यामागून सूत्र हलवत आहेत. त्यामुळेच ते मुंबई आणि दिल्ली वारी सातत्याने करत आहेत. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी इशारा दिला आहे.

जे काही सुरु आहे ते निपटायला शिवसेना समर्थ आहे. आमचे आम्ही बघून घेऊ. देवेंद्र फडणवीस तुम्ही या फंद्यात पडू नका, आमचा आम्ही बघून घेतो. स्वत:ची उरलीसुरलेली प्रतिष्ठा धुळीस मिळवू नका, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक झाली.

दरम्यान, पक्षविस्तारासाठी आमच्याकडे मोठी संधी आहे. पैसा आहे म्हणून कुणीही काहीही करु शकत नाही, असा टोला भाजपला राऊत यांनी लगावला.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये