संजय राऊतांच्या अडचणीत वाढ; ईडीची पिडा पाठलाग सोडेना
![संजय राऊतांच्या अडचणीत वाढ; ईडीची पिडा पाठलाग सोडेना sanjay raaut 1](https://rashtrasanchar.com/wp-content/uploads/2022/08/sanjay-raaut-1-780x470.jpg)
मुंबई – Sanjay Raut : शिवसेनेचे तडफदार नेते खासदार संजय राऊत हे सध्या ईडीच्या कचाट्यात सापडलेले आहेत. कथित पत्राचाळ आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात संजय राऊत यांना दोन दिवसापूर्वी ईडीकडून ताब्यात घेण्यात आलेले आहे. आज पर्यंत त्यांना ईडी कोठडीत राहावे लागणार होते. मात्र, आज झालेल्या सुनावणीत त्यांच्या कोठडीमध्ये वाढ झाली आहे. ८ ऑगस्ट पर्यंत संजय राऊत यांना ईडी कोठडीत मुक्काम करावा लागणार आहे. त्यामुळे संजय राऊत यांच्या अडचणी वाढताना दिसत आहेत.
दरम्यान, आमचं न्यायव्यवस्थेवर विश्वास असल्याचं संजय राऊत यांचे बंधू सुनील राऊत यांनी म्हटलं आहे. संजय राऊतांना चुकीच्या पद्धतीने त्रास दिला जात आहे. संजय राऊत यांचा प्रवीण राऊतांशी संबंध जोडणं चुकीचं आहे. आमच्याकडे सर्व कागदपत्रे योग्य आहेत. आम्ही ईडीला सहकार्य करू अशी प्रतिक्रिया सुनील राऊतांनी दिली आहे.
संजय राऊतांना भाजप घाबरते. उद्धव ठाकरेंपासून राऊत यांना वेगळं करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. ही संपूर्ण केस राजकीय केस असल्याचं सुनील राऊत यांनी म्हटलं आहे. त्याचबरोबर प्रवीण राऊत हे आमचे निकटवर्तीय आहेत. त्यांचा देखील कोणत्याही आर्थिक घोटाळ्यात काही संबंध नसल्याचं सुनील यांनी म्हटलं आहे.