ताज्या बातम्यामहाराष्ट्ररणधुमाळी

छत्रपती संभाजीनगरचं? नामांतराविरोधातील याचिकेवर सुनावणीस सर्वोच्च न्यायालयाचा नकार!

छत्रपती संभाजीनगर : नऊ महिन्यापुर्वी मविआ सरकारनं शेवटच्या कॅबिनेटमध्ये औरंगाबादचे नामांतर करुन संभाजीनगर असं करण्यात आलं. त्यानंतर राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली अन् भाजप-शिंदे गटाचं सरकार आलं. उद्धव ठाकरे यांना श्रेय घेता येवू नये म्हणून शिंदे-फडणवीस सरकारनं औरंगाबादचे नामांतर छत्रपती संभाजीनगर असं करण्यात आलं आहे. त्याला नुकतीस केंद्रीय गृह मंत्रालयाने मान्यता दिली आहे.

दरम्यान, या निर्णयाला आव्हान देणारी जनहित याचिका सर्वोच्च न्यायालयात करण्यात आली होती. सदर याचिका आज शुक्रवार २४ मार्च 2023 रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणीस आली असता, सदर जनहित याचिका स्विकारण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला.

तसंच नामांतरासंदर्भातील सदर याचिकेची मुंबई उच्च न्यायालयाने दखल घेतल्याचेही सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांनी सुनाणीदरम्यान स्पष्ट केले आहे. या जनहित याचिकेवर आता सोमवारी मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी घेण्यात येणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये