मंकीपॉक्सचा देशातील दुसरा रुग्ण समोर; चिंता वाढली!
तिरुअनंतपुरम्- Monkeypox patient : मागील दोन वर्षांत कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे जगाला मोठ्या जीवित आणि आर्थिक हानीला सामोरं जावं लागलं आहे. नुकतंच कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असताना आता पुन्हा एकदा मंकीपॉक्स नावाच्या नवीन विषाणूने जगभरातील लोकांना चिंतेत पाडलं आहे. मंकीपॉक्स या विषाणूचा अनेक देशांत प्रभाव वाढत चालला आहे. चिकन पॉक्स (कांजण्या) या रोगाप्रमाणेच लक्षणे असणारा हा रोग वेगाने प्रसारित होत आहे.
दरम्यान, १४ जुलै रोजी केरळ मध्ये युएईहून परतलेला मंकीपॉक्सची लक्षणे असणारा पहिला रुग्ण समोर आला होता. त्यानंतर देशातील आरोग्य यंत्रणेने नागरिकांना सतर्कतेचा इशारा देखील दिला आहे. मात्र, देशातील दुसरा मंकीपॉक्सची लक्षणे असणारा रुग्ण केरळ मध्येच समोर आला आहे. नवीन रुग्णाचा ३१ वर्षीय रुग्णाशी संबंध आलेला होता. मात्र, त्यामध्ये रोगाची लक्षणे उशिरा समोर अली आहेत. त्यामुळे चिंता अजून वाढली आहे.
केरळमधील कन्नूर जिल्ह्यात मंकीपॉक्सचा भारतातील दुसरा रुग्ण आढळून आला आहे. दुबईहून परतलेल्या कन्नूरच्या 31 वर्षीय रहिवाशात सोमवारी मंकीपॉक्सची लक्षणे आढळून आली. रुग्णावर उपचार सुरू आहेत.