रणधुमाळीराष्ट्रसंचार कनेक्टसिटी अपडेट्स

सच्च्या कार्यकर्त्याला तुमच्यापर्यंत नेते पोहोचू देत नाहीत : आ. मिसाळ

पुणे : पुण्यातील पदाधिकारी कार्यकर्त्यांना तुमच्यापर्यंत पोहोचू देत नाहीत. चंद्रकांत पाटलांसमोरच माधुरी मिसाळ यांनी खदखद व्यक्त केली. पालकमंत्री झाल्यानंतर पुणे शहर भाजपच्या वतीने चंद्रकांत पाटील यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला पुणे शहरातील आमदार आणि नगरसेवक उपस्थित होते.

या वेळी आमदार माधुरी मिसाळ यांनी चंद्रकांत पाटील यांच्यासमोरच आपल्या मनातील खदखद बोलून दाखवली. कार्यकर्ता मोठा झाला, तर आपल्याला नुकसान होईल म्हणून सच्च्या कार्यकर्त्याला तुमच्यापर्यंत नेतेमंडळी पोहोचू देत नाहीत असे त्या म्हणाल्या.

मिसाळ यांनी केलेल्या या वक्तव्याने उपस्थित कार्यकर्त्यांनीही टाळ्यांचा कडकडाट केला. मिसाळ म्हणाल्या, की राज्यात आता भाजपचे सरकार आले आहे. विविध महामंडळांवर आता आपल्या कार्यकर्त्यांना न्याय द्या. अशी मागणी करत त्यांनी शहरातील नेते मंडळी तुमच्यापर्यंत कार्यकर्त्यांना पोहोचू देत नाहीत अशी खंत देखील व्यक्त केली.

सच्चा कार्यकर्ता मागे राहत असून, त्याला न्याय द्या, अशी मागणी ही मिसळ यांनी यावेळी केली. राज्यात भाजपचे सरकार नसताना जे कुंपणावर होते त्यांनाही लक्षात ठेवा आणि आगामी महापालिका निवडणुकीत निष्ठावंतांना न्याय द्या, अशी मागणी त्यांनी या वेळी केली.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये