एक एकनाथ सर्वांचा नाथ !

राजाभाऊ त्रिगुणे, ज्येष्ठ पत्रकार
शिवसेना पक्षप्रमुखांविषयी असणारे गुरुतुल्य म्हणून तुम्ही खासदारकीतून वाचलात नव्हे, तर तुमचा खासदारकीचा कोथळा कधीच बाहेर काढला गेला असता.
खातात कुणाचे आणि ओरडतात कुणावर जर उद्धव ठाक यांच्या शिवसेनेच्या प्रवक्त्याची धमक असेल तर त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर चाल करून दाखवावी, सकाळी सकाळी पत्रकारांना थैल्या देऊन बडबडत बसू नका? कारण आताची महाराष्ट्रातील जनतेची अशी अपेक्षा होती, की प्रवक्ते संजय राऊत फार बुद्धिमान आहेत, तर ते राज्यसभेतील निवडणुकीत शेवटच्या सीटवर बसून ए.टी.के.टी.वर पास झालेले आपण खासदार आहात. याचे कारण फक्त आणि फक्त विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कट्टर विरोधक आहात हे आहे. तरीसुद्धा शिवसेना पक्षप्रमुखांविषयी असणारे गुरुतुल्य म्हणून तुम्ही खासदारकीतून वाचलात नव्हे, तर तुमचा खासदारकीचा कोथळा कधीच बाहेर काढला गेला असता. मुख्यमंत्री शिंदे यांना आव्हान देणारी दुसरी औलाद अजून पैदा झाली नाही, कारण जे सर्वकार्येषु योद्धा असतात, त्यांना तथाकथित राष्ट्रव्यापी थापाड्यांची गरज नसते.
शिवसेना संपवण्याची सुपारी कुणी घेतली, हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईतील एका जाहीर सभेत बोलताना सांगितले. जाधव नावाच्या एका अपंग व्यक्तीला व्यासपीठावर बोलावून त्यांचा यथोचित सन्मान केला. त्यावेळी ते म्हणाले, प्रत्येक नागरिकाला वाटले पाहिजे, की मीच मुख्यमंत्री. याला म्हणतात जनतेबद्दलचे प्रेम!
शिवसेना संपवण्याची सुपारी घेऊन त्यातली कतरी सुपारी देऊन, ती बगलेत घेऊन दिवसाढवळ्या चित्रविचित्र भाषेत असभ्य बोलणार्या प्रवक्त्यांची कुवत नाही. पण ही माध्यमांच्या माध्यमातून म्हणजेच पैसे मोजून डरकाळ्या का फोडतात आणि कशासाठी फोडतात? पुरोगामी माध्यमे नवाब मलिकांच्या आर्थर रोडच्या किंवा साहेबी निवासी तेरा तेरा वार्या करण्यात मग्न असावेत. नाहीतर त्या मुंबई महापालिका निवडणुकीत सतत तीन वेळा निवडून आलेल्या आणि यंदा पराभूत झालेल्या एका नगरसेविकेने खासदार संजय राऊत यांच्या जाहीर सभेत इतकी अश्लील भाषा एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटासंदर्भात वापरून श्वेताताई पाटकर यांच्याविरोधात राऊतांनी पाठ थोपटली नसती.
कालांतराने याच ताईंनी खासदार संजय राऊत यांना पोकळ बांबूचे फटके देऊन टाकलेसुद्धा! पण अकस्मात याच ताईंना उपरती झाली आणि त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश केला, कारण त्यांनी व त्यांच्या कार्यकर्त्यांनी एका नवयुवकाच्या हत्येचा प्रयत्न केला होता. ज्याला ईडी वाचवायची, ज्याला सी. डी. वाचवायची, ज्याला आयकर खपवायचा आहे, अशी मंडळी एकनाथ शिंदे यांच्या बंडावळीत आहेत, पण मातोश्रीला कुणी पन्नास लाखाचे घड्याळ दिले? अहो, या जगात असा एकही माणूस नाही, की जो कुणाचीच चाकरी करीत नाही, कारण चाकरी केल्याशिवाय कोरभर भाकरी मिळत नाही. पण ज्यांनी भाकरीचे महत्त्व बारामतीच्या खुंटीला टांगून ठेवले असेल तर माझी मातोश्री म्हणजेच आई काय आणि किती सहन करणार?