देश - विदेश

“…तर रक्ताचे पाट वाहिले असते”, शिवसेनेतील बंडखोरीवर अपक्ष आमदाराच विधान चर्चेत!

नगर : (Shankarrao Gadakh On Shivsena) एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरी केल्यामुळं शिवसेना पक्षात उभी फूट पडली आहे. ४० आमदार शिंदे गटात सामील झाले, तर उरलेले १५ आमदार अद्याप यांच्यासोबत आहेत. अपक्ष आमदार शंकरराव गडाख देखील उद्धव ठाकरेंसोबत असल्याच त्यांनी आज जाहीर केलं आहे. मी अपक्ष आमदार म्हणून निवडून आलो असलो, तरी काही सिद्धांतामुळे उद्धव ठाकरे आणि शिवसेनेसोबत आलो होतो.

दरम्यान, अहमदनगर येथे केलेल्या जाहीर भाषणात बोलत होते, मंत्रीपद गेलं याचं वाईट वाटत नाही. मात्र, राज्यातील विकासकामं थांबतील, याचं वाईट वाटतंय. माझ्यामध्ये काही कौशल्ये आहेत. त्या कौशल्याच्या बळावर मी विकासकामं पूर्ण करण्याचा अवश्य प्रयत्न करणार करेल. पण वाईट याचं वाटतंय की उद्धव ठाकरे यांच्यासारख्या संयमी माणसाला अशा पद्धतीने घरी जावं लागलं. त्यावेळी अडचणीच्या काळात मी उद्धव ठाकरेंना फोन केला आणि ठाकरेंसोबत राहण्याचा निर्णय घेतला.

पुढे बोलताना गडाख म्हणाले, मला याठिकाणी आवर्जून एक गोष्ट सांगायची आहे. शिवसेना ही जहाल संघटना आहे, बंडखोरी होताना रक्ताचे पाट वाहिले असते. बाळासाहेब ठाकरेंनी शिवसैनिकांच्या रक्तामध्ये एक वेगळी ताकद आणि रग निर्माण केली आहे. असा बंड होत असताना शिवसेनेसारखा पक्ष उद्धव ठाकरेंच्या हाती होता. राज्यामध्ये नव्हे तर देशात बोट दाखवेपर्यंत रक्ताचे पाट वाहिले असते. पण या माणसाने स्वत: कमीपणा घेऊन हे सगळं थांबवलं. त्यांनी संयमाने भूमिका घेतल्यानं पुढं काय झालं ते आपण सगळ्यांनी पाहिलं, असंही ते म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये