मराठवाडा विद्यापीठाकडून ‘डी लीट’ पदवी मिळताच, शरद पवार भावूक!

औरंगाबाद : (Sharad Pawar emotional after getting ‘D Leet’ degree) महाराष्ट्रातल्या राजकीय वर्तुळाच्या नजरा आज एका खास कार्यक्रमाकडे होत्या. या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर राष्ट्रवादी आणि भाजप या दोन विरोधी पक्षांचे तगडे नेते उपस्थित आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, भाजप नेते आणि केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी उपस्थित आहेत.
दरम्यान, यावेळी गडकरी आणि पवार या दोघांनाही डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाकडून डी लीट पदवी देण्यात आली आहे. या सोहळ्यात बोलताना शरद पवार भावुक झाल्याचे दिसून आले. ज्या मराठवाडा विद्यापीठामुळे सत्तेवर पाणी सोडावं लागलं. त्याच विद्यापीठाने जवळजवळ 32 वर्षानंतर डी. लिट देऊन गौरव केल्यामुळे शरद पवार भावूक झाले.
या सोहळ्यावेळी बोलताना पवार काही वेळ शांत राहिले. पदवी मिळाल्यानंतर शरद पवार यांनी मराठवाडा आंदोलनातील आठवणींना विद्यापीठाच्या निर्मिती प्रक्रियेपासूनच्या एकंदरीत आठवणींना उजाळा दिला. पुढे ते म्हणाले की, आजकाल मिळणाऱ्या शिक्षणाचा दर्जा सुधारला आहे. वेगवेगळ्या गोष्टींचं शिक्षण घेता येत आहे. यावेळी त्यांनी विद्यापीठाचे कुलगुरू आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे आभार मानले.